भोई समाज बांधवांनवर आली उपासमारीची पाळी
प्रतिनिधी / कारंजा घाडगे :
जिल्हा वर्धा येथील भोई समाज बांधवांनवर आणली उपासमारीची पाळी कार नदी मत्स्य सहकारी संस्था हि नदी प्रकल्पावर नोंदणी झाली होती व याच संस्थेला हा प्रकल्प मासेमारीसाठी देण्यात आला होता कार नदी प्रकल्प म्हणजेच खैरी डयाम या सस्थेत सचिव पदावर रंजना राजू केन्डे असल्यामुळें तिने भोई समाज बांधवांनचा अशिक्षित पनाचा गैर फायदा घेऊन १४ वर्षापासून भोई समाज बांधव यांच्यावर अन्याय, अत्याच्यार करीत होती आणि या बाईचा मुलगा फिशरीज डिपार्टमैंट मध्ये असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी हात मिळवून बिनधास्तपणे संस्थेत भ्रष्ट्राचार चालू होता, पण त्यावर कोणीही लक्ष देत नव्हते, मासेमार ऑफिसमधे जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केल्यास त्यांना त्यांचा मुलगा मासेमारांना जीवे मारण्याची धमकी देत होता संस्थेतिल अध्यक्ष, सचिव यांनी १४ वर्षापासून संस्थेतील सभासदाला कधीच संस्थेचा हिशोब दिला नाही. संस्थेला सभासदांच्या नावावर मिळालेले अनुदान सुद्धा सभासदाला दिले नाही, तसेच शासकीय धोरणांच्या आधारे ६ महिन्याची अवधी तलाव ठेका रक्कम भरण्यासाठी दिली होती. परंतु वर्धा येथील सहायक आयुक्त यांनी लाच घेऊन जलदेवि संस्थेला तलाव ठेका देण्यात दिला.त्यानंतर कार नदी संस्थेतिल सभासदांनी आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे अपील दाखल केली असता त्यांनी दोन्ही संस्थेला तलाव वाटप करण्यात यावा असे आदेश देऊन सुद्धा सहायक आयुक्त वर्धा यांनी दोन्ही संस्थेला तलाव वाटप न करता आयुक्त यांच्या आदेशाच्या अवहेलना करून सुद्धा सहायक आयुक्त वर्धा यांच्यावर कुठलीही चौकशी करण्यात आली नसून त्यांनीच सचिव यांचे अभिप्राय घेण्यात यावे असे सांगन्यात आले म्हणून नाईलाजाने जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन सहा दिवसात योग्य निर्णय घेऊन तोडगा काढण्यात न आल्यास उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा प्रकारचे निवेदन देऊन अवगत करण्यात आले जेव्हा आपल्या हक्कासाठी आपले समाज बांधव उपोषणाला बसणार तेव्हा समाज बांधव आणि तसेच मानवाधिकार सहायता संघातिल पदाधिकाऱयांनी उपोषणाला पाठींबा द्यावा हि विनंती तशी दिलेल्या पत्रकातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी उमेश आमझीरे, लक्ष्मण नान्दने, हरीचन्द नान्दने, शंकर आमझीरे, दुर्गा आमझीरे यासह इतरई भोई बांधव उपस्थित होते