मदना येथील पोलीस पाटील चालवतो गावाचा कारभार ; नागरिकांशी असभ्य वागणूक; नागरिकांची पोलिस अधीक्षकांना तक्रार
प्रतिनिधी / मदनी (आमगाव) :
परिसरातील मदना येथील पोलीस पाटील गावात नसल्याबाबत गावकऱ्यांची ओरड असून आजी मोठी येथे राहत असल्याचे सांगितल्या जाते मात्र अडी-अडचणी वाद विवाद मिटवण्यात करिता पोलीस पाटील गावात स्थानिक असणे आवश्यक आहे गावात वाद तंटे अवैद्य धंदे या बाबत तक्रार कोणाकडे कोणाकडे करायची समस्या उद्भवल्यास कोणाकडे जायचे असा प्रश्न ग्रामस्थ करीत असून खरांगणा मोरांगणा येथे पोलिस पाटलांचा तुळजाई धाबा असून व्यवसायाकडे विशेष लक्ष असून मदना या गावाकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जाते. येथील पोलीस पाटील गावातही येत नाही त्यामुळे गावाकडे दुर्लक्ष असून येथील पोलीस पाटील पदभार स्वीकारल्या पासून गावात भांडणे तंटे युवकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे स्थानिक नागरिकांची तक्रार दिसून येत आहे. गावात पोलीस पाटील राहात नसल्याने या गावांमध्ये काय चालते याची माहिती पोलिसांना मिळत नाही. पोलीस स्टेशन लांब अंतरावर असल्याने या ठिकाणी दररोज पोलीस येऊन पाहणी करून शकत नाही. त्यामुळे या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत काय परिस्थिती आहे. ती पोलिसांना समजू शकत नाही. गावातील लोकांकडून पोलीस पाटलांना विचारणा होत असताना अश्लील शब्दांचा वापर करून लोकांना दमदाटी करून धमकी देण्यात येत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितल्या जाते. लोकांशी अरेरावीची भाषा बोलून तुमचा बापाचा नौकर नाही. मी पोलिस पाटील आहे. तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवणूक करून तुमच्यावर केस दाखल करण्यात येईल. अशा प्रकारच्या धमक्या ग्रामस्थांना दिल्या जात असल्याने मदना ग्रामस्थांकडून पोलीस अधीक्षक वर्धा त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचे दिसून येते. मात्र, गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाईची हालचाल दिसून येत आहे.गावाचे प्रश्न खरच मिटवणार काय? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.