मनसेला वर्धा जिल्ह्यात मनसेला खिंडार :मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांनी घेतला राष्ट्रवादी काँगस पार्टीत प्रवेश
मनसेला वर्धा जिल्ह्यात मनसेला खिंडार :मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांनी घेतला राष्ट्रवादी काँगस पार्टीत प्रवेश
इक्बाल पहेलवान / हिंगणघाट :
मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते झाला प्रवेश…
अतूल वांदीले यांच्या नेतृत्वात उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकर सह पन्नास मनसे पदाधिकाऱ्यांचा झाला पक्ष प्रवेश
प्रतिनीधी/हिंगणघाट
मनसेला वर्धा जिल्ह्यात खिंडार पडले असून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतूल वांदिले यांच्यपाठोपाठ आता मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँगस पार्टीत प्रवेश घेतला आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.
अतूल वांदीले यांच्या नेतृत्वात उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकर सह पन्नास मनसे पदाधिकाऱ्यांचा हा पक्ष प्रवेश झालेला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोधजी मोहिते , वर्धा जिल्हा निरिक्षक राजुभाऊ ताकसाळे, युवा राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे कार्याध्यक्ष सूरजजी चव्हान, युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे , वर्धा जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप कीटे, वर्धा जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी म्हणून फक्त वर्धा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात अतूल वांदीले यांना जवाबदारी घेऊन काम करण्यासाठी सांगीतले.
नव्याने पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांची गुणवत्ता पाहून स्थान दीले जाईल अशे देखील ते बोलले. या पक्षात नवे जुने असे काहीं नसून मेरिट वर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दीला जाईल अशे देखील ते बोलले.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, हिंगणघाट तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष मारोती महाकाळकर, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अजय पर्बत, शेतकरी सेना जिल्हा सचिव प्रल्हाद तुराळे, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष शंकरराव देशमुख, मनसे हिंगणघाट शहर अध्यक्ष जावेद मिर्झा, कांढली सर्कल अध्यक्ष हरिदास तराळे, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष गजानन चिडे, समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर येंडे, समुद्रपूर तालुका सचिव अमोल मेंडुले, समुद्रपूर शहर उपाध्यक्ष पुरुषोत्तम कांबळे, हिंगणघाट शहर उपाध्यक्ष परम बावणे , प्रशांत एकोनकर, राजू खडसे ,दीपक चांगल, पप्पू आष्टीकर, रवी सोनकुसरे, प्रफुल्ला आंबटकर ,देविदास चौधरी ,पंकज भट, राजू मेसेकर, अनिल भुते ,रमेश चतुर, प्रवीण हटवार, बाबाराव गुंडे, शेखर दाते ,राकेश खाटीक ,जितेंद्र भुते ,तुकाराम कापसे, प्रवीण भुते, आशिष दंतलवार, निखिल शेळके, मिथुन चव्हाण, निखिल ठाकरे, मनीष मुडे, जितेंद्र पंढरे, विकास चिंचोलकर, मनोहर सुपारे, अनिकेत वानखेडे , बालेश कोवाड, संतोष हेमके ,अभय सावरकर, कार्तिक वाढई, सौरभ वैरागडे ,कुणाल भुते, सुरेंद्र पाटील, संकेत बेतवार, गणेश वैद्य , अलीमबेग मुर्तुजाबेग मिर्झा, अकील खान जमील खान इत्याती पदाधिकारी व शाखा अध्यक्ष यांनी प्रवेश घेतला.