🔥मनस्वी पिंपरीने बोटणी ते वणी अंतर यशस्वीपणे पूर्ण केले! ठिकठिकाणी अभिनंदन व सत्कार!.
वणी -/ मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील कु. मनस्वी पिंपरे हिने 23 जानेवारी रोजी बोटोनी ते वणी हे 30 किमीचे अंतर अडीच तासात स्केटिंग ने चालवून नवीन विक्रम केला. कू. मनस्वी विशाल पिंपरे ही सध्या आपल्या आई वडिलांसोबत पुणे येथे राहते. पुणे येथे असताना अवघ्या तीन वर्षाची मनस्वी असताना घराजवळ सुरू असलेली स्केटिंगच्या क्लास जवळ उभे राहून बघायची. ती दररोज स्केटिंग बघायला येत असल्यामुळे प्रशिक्षक विजय मलजी यांनी तिला विचारपूस केली. अन प्रशिक्षणास दाखल झाली. पुढे तिने स्केटिंगच्या 94 स्पर्धेत भाग घेतला. 104 सुवर्णपदक पटकावली. काही ब्रांच आणि सिल्वर ही आहे. असे एकूण 137 पदके तिच्या नावावर जमा आहेत. याआधी मनस्वी ने बोटोनी ते मारेगाव असे बारा किलोमीटरचे अंतर स्केटिंग ने पार करून वाहवा मिळविली. तिचे नाव लिमका रेकॉर्डमध्ये तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदले गेले आहे. तिने दिनांक 23 जानेवारी रोजी बोटोनी ते वणी असा 30 किलोमीटरचा प्रवास अडीच तासात स्केटिंग ने पूर्ण केला. रस्त्यात पडणारे गावे जसे मारेगाव,मंगरूळ, गौराळा, निंबाळा व चिखलगाव इत्यादी अनेक गावांमध्ये तिचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. वणी मध्ये आल्यानंतर तिचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी मनसेच्या वतीने मनस्वी व तिच्या आई-वडिलांचा तसेच तिचे कोच विजय मलजी यांचा सुद्धा सत्कार केला. प्रसंगी रोटरी क्लबचे पदाधिकारी लवलेश लाल, अंकुश जयस्वाल, अनिल उत्तरवार इत्यादींनी मनस्वी चा सत्कार केला. त्यानंतर तिचा सत्कार लायन्स कॉन्व्हेंट वणी येथे करण्यात आला. त्या ठिकाणी मनस्वी चा सत्कार हा लायन्स कॉन्व्हेंट चे पदाधिकारी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, बलदेव खुगर यांनी केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले. सदर कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर मनस्वी चा सत्कार हा भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजय बाबू चोरडिया यांनी वणी जवळील गणेशपुर येथे स्केटिंग गर्ल मनस्वी चा भव्य सत्कार केला. सदर प्रसंगी तिच्या आई-वडिलांचा व कोच विजय मलजी यांचाही भव्य सत्कार केला. सदर कार्यक्रमाला अनेक पत्रकार व नागरिकांची गर्दी होती. विजय बाबूंनी नेहमी प्रमाणे पाहुण्यासह उपस्थित सर्वांची भोजनाची व्यवस्था केली होती हे विशेष.