महसूल कर्मचारी बेमुदत संपावर…..

0

🔥आवश्यक कामाचा खोळंबा…

देवळी -/ तालुक्यातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे महसूल कर्मचारी मागील एक आठवड्यापासून बेमुदत संपावर गेल्यामुळे तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प झालेले आहे. सध्या शैक्षणिक सत्र तसेच शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व विविध दस्तऐवजातील आवश्यक असल्याकारणाने तहसील कार्यालयामध्ये दररोज चकरा माराव्या लागत आहेत.देवळी तहसील कार्यालयातील १४ कर्मचारी संपावर गेल्याचे सांगण्यात येत आहे. तहसील कार्यालयाचा फेरफटका मारला असता तहसील कार्यालयातील कामकाज कर्मचारी नसल्यामुळे ठप्प झाल्याचे दिसून आले.महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हा संप पुकारण्यात आला असून मागण्याची तरजोड करण्याकरिता महाराष्ट्र शासनाबरोबर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.संप त्वरित मिटावा अशी नागरिकांची मागणी आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!