महसूल विभागाची अवैध रेती वाहतूकीवर धडक कारवाई….

0

🔥महसूल विभागाची अवैध रेती वाहतूकीवर धडक कारवाई.

हिंगणघाट -/ महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई करीत लाखो रुपयाचा अवैध रेतीसाठी पकडला. ही कारवाई तहसील कार्यालय हिंगणघाट व जिल्हा खनिकर्म विभाग यांनी संयुक्तपणे केली.
दिनांक २८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास महसूल पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे हिंगणघाट तालुक्यातील मौजा कुटकी येथे नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अवैधपणे रेती वाहतूक करणाऱ्या ९ ट्रक वर कारवाई करण्यात आली. सदर नऊही ट्रक जप्त करून तहसील कार्यालय हिंगणघाट येथे जमा करण्यात आले. १) पंकज बाबाराव निवाल,रा भिवापूर वर्धा २) भूषण मनोहर सुरकार रा. वर्धा ३) राजू तायवाडे ,रा बोरगाव मेघे, ४) संजय जुमडे रा.येळाकेळी५) प्रमोद सुरेश घुमडे,रा. येडाकेळी६) हितेश भाडेकर,रा. येळाकेळी.७) महेश हिरामण पंचभाई येळाकेळी ८) दीपक राजू पारवेकर तळेगाव टा. ९)हितेश खांडेकर यांच्या
सर्व वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७)(८)नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाई जिल्हाधिकारी वन्मथी सी, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे व यांचे मार्गदर्शनामध्ये तहसीलदार योगेश शिंदे ,जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके ,नायब तहसीलदार भलावी व इतर यांनी केली.
हिंगणघाट चे तहसीलदार योगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या अवैध रेतीवर ज्यावेळी कारवाई करण्यात आली त्यावेळी वाहनधारकाजवळ कोणत्याही प्रकारची रेतीची रॉयल्टी नव्हती. प्रत्येक ट्रक मध्ये तीन ब्रास रेती आहे असे गृहीत धरून नऊ ट्रक मधील २७ ब्रास रेतीवर ट्रक धारकाने रॉयल्टी न दाखवल्यास कारवाई करण्यात येईल व प्रत्येक ट्रक मागे एक लाख सत्तर हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येईल.या नंतरही रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात महसुल विभागाची कारवाई सुरुच राहील असेही पुढे बोलतांना शिंदे म्हणाले.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!