बाळापूर -/महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्रभर राज्यव्यापी आमरण उपोषण चालू आहे औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे सतिश तायडे यांनी सतत १७ दिवस आमरण उपोषणाला झुंज दिली परंतु त्यांची १७ व्या दिवशी त्याची तब्येत खालावल्याने त्यांना हॉस्पीटल मध्ये नेण्यात आले परंतु त्यांच्या जागी मनोज चौधरी यांनी आमरण उपोषण चालू ठेवले आमरण उपोषणाला ला बैठकीचे पत्र मिळाल्याने आमरण उपोषणाला स्थगिती देण्यासाठी आमरण उपोषण सोडण्यासाठी उपमुख्य अभियंता चव्हाण वेल्फर ऑफिसर रामटेके मॅडम.सिक्युरिटी ऑफिसर तळविकर पोलीस अधिकारी वानखडे,नायब तहसीलदार सय्यद,आ.रणधीर सावरकर,खा अनुप धोत्रे,यांनी वारंवार पाठपुरावा करून बैठकीसाठी खूप प्रयत्न केले व आमरण उपोषण सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मांगटे मा बळीराम सिरस्कार.रामदास पाटील लांडे.आशिष चंद्राभाऊ,नितीन लांडे,माधव मानकर,दादाराव पाटील लांडे,गणेश तायडे,विपुल घोगरे,विजय लोणाग्रे,नितीन नाय,लांडे बबलू पळसपगार,दिनेश आंबीलकर,विजय खंडेराव,गोपाल लांडे,सोनू लांडे,यांनी संघर्ष योद्धा सतीश तायडे व उपोषणकर्ते मनोज चौधरी यांना नारळ पाणी ज्यूस पाजून आमरण उपोषण तोडण्यात आले संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि बहुसंख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.तसेच आमरण उपोषणाला स्थगिती देऊन काम बंद आंदोलन हे सुरूच राहील.असे नितेश तायडे (उपाध्यक्ष) संघर्ष कंत्राटी कामगार समिती औष्णिक विद्युत केंद्र पारस यांनी सांगितले व आभार प्रदर्शन नितेश तायडे यांनी केले.