आष्टी शहीद-/आरामदायी गाळ्या म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसनी मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात मात्र महामंडळाच्या या भंगार बसेस मुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त गेल्या अनेक वर्षाच्या महाराष्ट्र राज्य मंडळाच्या जुन्या भंगार बसेस अजूनही सुरूच आहे. या तात्या उन्हाळ्याच्या दिवसात लगन सराई मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक परिवहन मंडळाच्या बसेसने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात मात्र या भंगार बसेस कुठे बंद पडेल याचा अंदाज नाही आजपर्यंत अनेक गाड्या तळेगाव आष्टी वरूड या महामार्गावर अनेक ठिकाणी बंद पडल्याचे निदर्शनात आले लागलीच प्रवाशांना त्या ठिकाणी दुसरी बस येईपर्यंत तापत्या उन्हाळ्याच्या दिवसात वाट पाहत बसावे लागते. अशा या भंगार बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बंद कराव्या व चांगल्या स्थितीत असलेल्या बसेस सुरू कराव्या जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तसेच अशा बसेस मुळे अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याने अशा भंगार बसेस बंद करून याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने लक्ष पुरवावे अशी मागणी प्रवासी करीत आहे.