🔥महाराष्ट्र राज्यातील महायुतीचे कलंकित आणि भ्रष्ट मंत्री यांची या सरकार मधून हकलपट्टी झालीच पाहिजे!!
हिंगणघाट -/येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे वर्धा येथील पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तथा पश्चिम विदर्भ संपर्क नेते खा.अरविंद्रभाई सावंत साहेब , तथा रमेशजी जाधव संपर्कप्रमुख – वर्धा यांच्या सूचनेनुसार तथा माजी उद्योग राज्यमंत्री अशोक भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा सतीश धोबे ,जिल्हा संघटक प्रमोद भोमले यांच्या प्रमुख उपस्थितीत जन आक्रोश आंदोलन महायुती सरकारच्या या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री तथा आमदार यांची हाकलपट्टी झालीच पाहिजे. याकरिता स्थानिक बजाज चौक येथे दुपारी ठीक १२:०० वाजता जन आक्रोश आंदोलनं करण्यात आले.
महाराष्ट्र हा भूभागाच्या दृष्टीने भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. या महाराष्ट्रात राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले ,शाहू महाराज ,महात्मा गांधी, टिळक यासारखे महान व्यक्ती या महाराष्ट्रात जन्माला आले. तसेच येथे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत तुकाराम यासारखे वारकरी, धर्मिक चळवळीतील मराठी संतांची भूमी आहे. संतांचा मोठा इतिहास इथे आहे. जे महाराष्ट्र संस्कृतीचे किंवा मराठी संस्कृतीचा पाया आहे. महायुती सरकारच्या शिंदे गटातील तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही भ्रष्ट मंत्री यांनी या महाराष्ट्राच्या संस्कृतीची पूर्णपणे पायमल्ली केली आहे. अशा या सर्व कलंकित आणि भ्रष्ट मंत्री तथा आमदार यांची त्वरित हकलपट्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राला आता नकोय असे कलंकित मंत्री! आणि त्याचा भ्रष्ट कारभार!! नकोय मुजोरपणाचा आणि काळ्याधंद्याचा भार ! हकलपट्टीसाठी त्यांच्या लावू आता ताकद एकजुटीने करू जन आक्रोशाचा वार!संचालन उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने यांनी केले आणि आभार प्रदर्शन नगर सेवक श्रीधर कोटकर यांनी केले.
या आंदोलनात युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत सातपुते,तालुका प्रमुख मनीष देवढे, महाविकास आगाडी चे जिल्हा समन्वयक श्री अविनाशजी काकडे, शहर प्रमुख मिलन गांधी, चंदू भुते,संघटक गजजन काटवले,शुभम सोरटे राज्य विस्तारक युवा सेना, लक्ष्मण डंभारे,सुभाष बांगडे,सुनील आष्टीकर, शंकर झाडे ,उप शहर प्रमुख अनंता गलांडे,शितल चौधरी,अमोल वादाफळे,सुरेश चौधरी,अमर शेंडे अपनी प्रजाहित पार्टी प्रमुख, करण शेंडे,दिनेश धोबे, हिरामण आवारी, प्रभाकर चामचोर,लक्ष्मण बकाने, ,गौरव गाडेकर,सुधाकर अगडे, संजय कपूर, निलेश बेंद्र,किसना शिखरे, कुमार हातांगडे, शंकर देशमुख,गजानन जाधव, भास्कर मानकर, सौ. धनश्री थोरात,सौ. शुभांगी खपली, मनीषा भारद्वाज,काजल गायकवाड,सुरेश चौधरी,विलास चौधरी, नितीन वैध,धर्मा शेंडे, शुभम निमजे, सुधाकर अगडे,युधिष्ठीर थोरात, संजय पिंपळकर,पप्पू घवघवे,अभिनंदन मुनोत,विजय कोरडे, गुणवंत वानखेडे,बलराज डेकाटे, गजानन ठाकरे, सतीश बोरसे, अनिल गुरू, नानकसिंगह बाबरी, प्रदीप गौतम, विनायक हेडाऊ,मीद पटेल, वैभव डांगे,शौकत अली सय्यद,संजय रहाटे,किशोर इंगोले,संजय बोरेकर, अमरसिंग चव्हाण,लक्ष्मण भोयर,विनोद ढगे,राजेराम भिषेकार,पिया खान, गोविंदराव रंदये,श्याम परसोडकर,मयूर, अंबोरे,करण शिवरूड, राहुल अंबोरे, विनोद अंबोरे,उमेश मोकसे, कार्तिक रहातटे, सुरेश बुरबादे, गोविंद जाधव, अंकुश सातपुते,अनिल दुर्वे,संजय सोनूरकर, जगदीश खुडसंगे, विशाल चौधरी, ललित वंजारी, प्रफुल भोयर, नितेश सातपुते,गणेश सातपुते, करण सातपुते,रुपानंद खपली, कलेश हातांगले, सुमित शेंडे, करण उपाध्ये,शक्तीसिंग टाक, सुभाष कदम, अंसुल शेंडे, दामोदर कोरे, संदीप जाधव, राहुल सातपुते,शिवसेना युवासेना व महिला आघाडी च्या कार्यकर्त्या शिवसैनिक युवासैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.