वर्धा -/ स्थानिक हनुमान मां दुर्गा मंदिर शास्त्री चौक वर्धा येथे 12 ज्योतिर्लिंगाचे पूजन कार्यक्रम लायन्स क्लब गांधी सिटी चे संचालक अनिल नरेडी, वर्धा कला महोत्सवचे अध्यक्ष संदीप चिचाटे, महंत मुकेश नाथ महाराज,सामाजिक कार्यकर्ते रमेश कछवा,प्रमोद मुरारका ,आशिष पोहाणे, मनोज तेलहांडे, अतुल रुईकर ,सीमा शुक्ला , नीता श्रीवास्तव,सुनील विरवंशी, सोनू ठाकूर, नीतू ठाकूर,राजेश पांडे , रवणाथ ठाकूर यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
या वेळी महंत मुकेश नाथ यांनी महाशिवरात्रीचे महत्व समजावून सांगितले. महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र. याचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्व ही आहे. या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा वाढते व व्यक्ती आध्यात्मिक शिखर गाठू शकतो. शास्त्रानुसार या दिवशी रात्रभर जागरण व उपवास केल्यास शरीर ,मन ,बुद्धी पवित्र होतात.
महाशिवरात्री निमित्त हजारो शिवभक्तांनी 12 ज्योतिर्लिंगाचे पूजन केले. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भजन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले.