महिला भाजपा ने मागितली नीता आनंदराव मडावी(बोरेले) यांना उमेदवारी पक्षाकडे निवेदन,समान्यांची मागणी सुद्धा इतर पक्षाकडे….
पांढरकवडा -/ येथील नीताताई मडावी (बोरेले) यांना आर्णी – केळापुर मतदार संघातुन उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी एका निवेदन द्वारे भा.ज.पा.तालुका महिला आघाडी आणि शहर भा.ज.पा.महिला आघाडी यांनी मोहनजी भगवत, सर संघचालक नागपुर, देवेंद्रजी फडणवीस, उप मुख्य मंत्री मुंबाई, नीतीनजी,गडकरी, मदनजी येरावार आमदार यवतमाळ. सुधीरजी मुनगंटीवार मंत्री,चंद्रपुर चंद्रकांतजी बावनकुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भा.ज.पा. नागपुर यांचे कळे केली आहे.
निवेदनावर 28, महिला पदाधिकारी आणि सदश्यांची स्वाक्षरी असून त्यांनी निवेदनात विषद केले की, पक्षाने पुरुषांन प्रमाणे महिलांना पण समान स्थान दिले आहे. उमा भारती,वसुंदरा राजे यांना मुख्यमंत्री केले आहे.अर्थ मंत्री निर्मला सीता रमण यांना तर मा.द्रोपदी मुर्मू यांना पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती केले आहे.
अत्यंत खेदाने आम्ही महिला पदधिकारी यांना सांगावे लागत आहे फक्त पक्ष निवळणुकीच्या वेळी प्रचार कार्य साठीच विचारात घेतात काय ? नुकत्याच लोक सभा निवळणुकिच्या वेळी अत्यंत उष्ण वातावर्नात महिलांनी जीवाचे राण करुण पार्टीच्या उमेदवार करीता प्रचार केला आहे.
त्या वेळी स्थानीक आमदार यांच्या निष्क्रियेते मुळे त्रस्त लोकांच्या आक्रोशाला आम्हा महिलांना समोर जावे लागले तरी शुद्धा आम्ही चोख पणे प्रचार कार्य पूर्ण केले.
केळापुर – आर्णी मतदार संघ हा आदिवासी करीता राखीव आहे.आज पर्यंत पक्षाने पुरूष यांनाच उमेदवारी दिली आहे. काही मोजके पदधिकारी स्वता: च्या स्वार्था पोटी बाहेरील काही निष्क्रिय पुरुष उमेदवार यांचे नाव मतदार संघाच्या उमेदवारी करीता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकळे पाटवीत आहे
पक्षाच्या प्रत्येक कार्या मध्ये आम्ही महिला निस्वार्थ व अत्यंत मेंहनतीने कार्य करतात.परंतु उमेदवारी निवळ मध्ये आम्हाला विचारले सुद्धा जात नाही. ही सर्वच महिलांची एक प्रकारे अवहेलना आहे. महिला कार्यकर्ते पाहिजे आणि महिलांचे मतदान देखील पाहिजे परंतु महिला उमेदवार दिले जात नाही हा संशोधनाचा विषय आहे.
या वेळी आम्हाला महिला उमेदवार केळापुर – आर्णी मतदार संघा करीता देण्यात यावे. आमच्या कळे उच्च विद्या विभुषित लढावु आणि कार्यशील सामान्य लोकांच्या समशयांची जाणीव असलेल्या आणि त्या साठी कार्य करण्यासाठी सर्व दृष्टीने सक्षम अश्या नीताताई मडावी हया महिला उमेदवार आहे. मतदार संघात तीन तालुके आहे. घाटंजी त्यांचा माहेर तर आर्णी येथील कुरहा (ढुमणी) हा आजोळ असून केळापुर तालुका येथील पांढरकवडा.रजनीकांत बोरेले यांच्या कढील सासर आहे.शालेय जीवना पसुनच त्या विविध सामाजिक संघटना आणि चळवळीशी सक्रिय जुळलेल्या असल्यामुळे सामान्य महिला व नागरिकांना परिचीत आहे. त्या पहली आदिवाशी महिला आहे ज्यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालय द्वारा संचालीत नेहरू युवा केन्द्र मार्फत जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त केल्या आहे.
विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या सामाजिक क्षेत्रां मध्ये दिलेल्या महत्वपूर्ण योगदान बाबत सन्मानीत केले आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी यांच्या आत्महत्या कळे गंभीरतेने लक्ष देवून उपाययोजना करावी या साठी नीता आनंदराव मडावी यांनी सन 2004 मध्ये मुंबाई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यात याचिका दाखिल केली होती. या वरून त्यांच्या दूर दृष्टिचा परिचय दिसून येते.
केळापुर – आर्णी विधान सभा मतदार संघाची उमेदवारी सक्षम महिला नेतृत्व नीताताई मडावी यांना उमेदवारी देवून भा.ज.पा.महिला यांचा आणि मतदार संघातील सर्व महिला भगिनी यांचा सन्मान करावे अशी मागणी सौ.सुगना मोहन कोरेवार, उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी पाटनबोरी, रजनी दोड़ेवार,उपाध्यक्ष भाजपा. महिला आघाडी पांढरकवडा. सौ.अंजली ग. अनाके शहर अध्यक्षा भाजपा महिला आघाडी,कु.पूनम म.गेडाम, सरचिटणीस भाजपा तालुका महिला आघाडी, कु.मनीषा अ. किनाके, सरचिटणीस भाजपा. तालुका आदिवासी महिला आघाडी, पांढरकवडा अश्या ऐकून 30,महिला भाजपा. पदधिकारी व सदश्यांनी मागणी केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे इतर पक्षा मध्ये सुद्धा कार्यकर्ते नीता मडावी (बोरेले) यांना उमेदवारी देण्या बाबत मागणी करीत आहे. कोनत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास त्या पक्षाला महिला मतांचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ब्युरो रिपोर्ट साहसिक news -/24 वर्धा
