महीलेला ओळखीच्या माध्यमातून अडीच लाखाने गंडवून तीच्यावर केला जबरदस्तीने बलात्कार….

0

आर्वी -/ सदर गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी महीला राहणार. एल. आय.जी. कॉलनी, आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन आर्वी येथे दिनांक ३०/०१/२०२५ रोजी तोंडी आणि लेखी रिपोर्ट दिली की, आरोपी अक्षय सुभाश माळोदे, राह. हातगाव, ता. हातगाव, जि. नांदेड येथील असून फिर्यादी सोबत ओळख करून फिर्यादी कडुन टप्याटप्याने एकुण २,५८,९००/- रू. उधारी घेतले व ते पैसे फिर्यादीने परत मागितले असता. फिर्यादीचा फायदा घेवुन तिला उधारी घेतलेले पैसे परत करतो असे म्हणुन अमरावती येथील लॉजवर बोलावुन तिचे सोबत जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध केले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन आर्वी येथे अपराध क्रमांक ९४/२०२५ कलम ३७६, ३७६ (२) (एन) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करून तपासावर घेतला.सदर गुन्हयातील आरोपी अक्षय सुभाश माळोदे, वय ३३ वर्शे, राह. हातगाव, ता. हातगाव, जि. नांदेड याचा गुप्तबातमीदार व सायबर सेल वर्धा यांचे मदतीने आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता. नमुद आरोपी हा वाशीम, जि. वाशीम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात दिनांक १५/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली.सदरची कारवाई अनुराग जैन,पोलीस अधीक्षक वर्धा,सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा,देवराव खंडेराव, उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सतीश डेहनकर, पो.उपनि. सर्वेश बेलसरे, पो.हवा./१२६७ दिगांवर रूईकर, पो.हवा./३२८ सागर कवडे, ना.पो.अं./१४६७प्रविण सदावर्ते, पो.अं./१६०४ निलेश करडे, पोअ/१७०६ स्वप्नील निकुरे पोलीस स्टेशन आर्वी व सायबर सेल वर्धा येथील पो.अं./ अक्षय राउत पो.अं./ अनुप कावळे यांनी केली.

राजू डोंगरे साहसिक NEWS-/24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!