वर्धा -/ ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालय ही एक आध्यात्मिक चळवळ आहे, जात, धर्म, लिंग, भेद, वंशिकता आणि राष्ट्रीयता पलीकडे शरीराऐवजी आत्मा म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या संकल्पनेवर ज्ञानाद्वारे आत्मा, चेतना केंद्रित करण्याची धारणा असलेली जागतिक संस्कृतीच्या निर्मित्तचे ध्येय बाळगणाऱ्या या संस्थेच्या मुख्यालय माउंट आबू, राजस्थान येथे आहे. शैक्षणिक सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात जगातील स्तरावर कार्य करणारी ही संस्था आहे. जे जगातील 140 देशात 850 केंद्र आहे. या संस्थेद्वारा सकारात्मक विचार, सेल्फ मॅनेजमेंट, लीडरशिप, लिविंग व्हॅल्यूस इत्यादी स्वतः व्यवस्थापनाच्या तत्वज्ञानाच्या लाभ घेऊन आपली मानसिक उन्नती करण्याचे ध्येय बाळगून सात दिवसाच्या ध्यान करण्याच्या लाभ घेणे हे एक पराकोटीची आनंददीयी अनुभूती आहे. अशी भावना मोहन बाबू अग्रवाल यांनी व्यक्त केली.ते नुकतेच माउंट अबू येथे सात दिवशी सामाजिक कार्यकर्ता संमेलनात भाग घेतला त्यावेळेस ते बोलत होते.या प्रसंगी वर्धा सेंटरचे राज्ययोगिनी माधुरी दीदी, मधु दीदी, रेणू दीदी, दिनेश अग्रवाल, भावना अग्रवाल, प्रकाश खंडार, अकोल्याचे वैद प्रकाश बंसल, आशादेवी बंसल आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थितीत होते.