🔥शिवसेना उबाठा गटाचे विठ्ठल गुळघाणे,यांनी केली बंडखोरी.
हिंगणघाट -/ विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटल्या दिवशीसुध्दा अपक्ष तसेच राजकिय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे अर्जासह हिंगणघाट विधानसभा निवडणुकीत एकूण १२ अर्ज कायम राहीले.
या मतदारसंघात भाजपाचे आमदार समीर कुणावार, माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, महाविकास आघाडीचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल वांदिले हे प्रमुख उमेदवार हे प्रमुख उमेदवार ठरले आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसला कोठारी- तिमांडे गटातर्फे तिमांडे यांनी राम राम करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना(उबाठा) च्या विठ्ठल गुळघाणे यांनीसुद्धा बंडखोरी करीत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे, यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वांदिले यांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी च्या वतीने प्रा.राजू तिमांडे यांनी बंडखोरी करू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु आज दि.४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. सुधिर कोठारी व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी आज स्थानिक निखाडे सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, या मेळाव्यात कोठारी यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेत प्रा. राजू तिमांडे यांना समर्थन जाहिर केले. यावेळी कोठारी- तिमांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने आमच्या मागणीचा विचार न केल्याने आम्ही हजारो कार्यकर्त्यासह पक्ष सोडून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ऍड.सुधिर कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी कोठारी यांचेसह गेल्या अनेक दशकांपासून या मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी केली, परंतु पक्ष नेतृत्वाने आमचेवर अन्याय केला असल्याचे मत प्रा. तिमांडे यांनी व्यक्त केले.
आमच्या कार्यकर्त्यांचे बळावर व ऍडव्होकेट सुधिर कोठारी यांच्या सहकार्याने येती विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचा दावा प्रा. तिमांडे यांनी केला.
आज शेवटल्या दिवशी विदर्भ राज्य समितीचे अनिल जवादे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.