🔥माझी लाडकी बहीण योजना शिबिरात महिलांची तुफान गर्दी.
आर्वी -/ राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु सुरू केली आहे.
आपल्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा ज्या महिला योजने पासून वंचित झाल्या होत्या करिता येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व आलेल्या महिलांनी आपल्या नोंदणी करून घ्याव्यात असे सांगितले. एवढेच नाही संपूर्ण सुरू असलेल्या योजनाचा लाभ माझ्या मतदार संघातील प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळावा याकरिता मी प्रयत्नशील आहे. असे वाक्य आर्वी विधानसभा क्षेत्र माझी लाडकी बहीण योजना अध्यक्ष आमदार दादाराव केचे
यांनी लाडक्या बहिणीचा देवा भाऊ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रचार प्रसार संवाद महा शिबिर कार्यक्रमात बोलले.
या कार्यक्रमाचे आयोजन सहकार मंगल कार्यालय आर्वी येथे करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रमात मंचावर आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस,प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश सुधीरजी दिवे, भाजपा सचिव महाराष्ट्र प्रदेश सरिता ताई गाखरे, भाजपा महिला मोर्चा वर्धा जिल्हा वैशाली येरावार,भाजपा महामंत्री वर्धा जिल्हा अशोक विजकर, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस अर्चना वानखेडे, नीता गजाम,बाला भाऊ नांदुरकर, रंजना कदम, धर्मेंद्र राऊत उपस्थित होते.
माजी खासदार रामदास तडस, सुधीर दिवे, सरिता गाखरे,वैशाली येरावार, अर्चना वानखडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत संपूर्ण सुरू असलेल्या योजनेची माहिती दिली.व योजना कायम सुरू ठेवण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे सरकार आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
आयोजित कार्यक्रमात आर्वी तालुक्यातील शहरातील व ग्रामीण भागातील महिलांची तुफान गर्दी होती. कार्यक्रम आटोपल्यावर शहरात जागोजागी महिलांची गर्दी होती. आयोजित शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत सुरू होते. हजारोच्या संख्येने उपस्थित महिलांकरिता जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टी द्वारा आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महा शिबिर यशस्वी करिता प्रशांत वानखेडे ,संगीता ढोकणे हर्षल शेंडे ,राहुल गोडबोले ,जया चौबे, नितीन मेश्राम ,उषा सोनटक्के, शुभांगी भिवगडे, सारिका लोखंडे, प्रतिभा गिरी, पल्लवी काळे, उर्मिला पवार ,शुभांगी गाठे, रंजना कदम, दुर्गेश नंदनी पुरोहित, वैशाली दापुरकर कांता सरोदे, निर्मलाउज्जैनकर ,आशा निंबोरकर रोशनी सूर्यवंशी स्मिता पोकळे ,संगीता डोंगरे, सुनिता वाघमारे ,भारती देशमुख, कांता कसर सुमित्रा उईके यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश देशमुख, संचालन नंदू वैद्य व आभार उषाताई सोनटक्के यांनी मानले.