मानवतेसाठी बुलंद आवाज,मानव अधिकार संघटना !,सामाजिक अन्यायाविरुद्ध ठरत आहे आशेचा किरण!

0

🔥मानवतेसाठी बुलंद आवाज,मानव अधिकार संघटना !,सामाजिक अन्यायाविरुद्ध ठरत आहे आशेचा किरण!.

हिंगणा -/ तालुक्यात आज संजय लोहितकर, कार्यकारी अध्यक्ष — महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रीय मानव अधिकार सेवा संघटना (भारत, नवी दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ कार्यालय, हिंगणा येथे भेट देत संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.

आजच्या धावपळीच्या काळात गरीब, पीडित व दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्याय, शासकीय अनास्था, पोलिसी दडपशाही व सामाजिक भेदभावाविरोधात आवाज उठवणारी ही संघटना जनतेसाठी एक आशेचा किरण ठरत आहे.

या संघटनेचे कार्य कोणत्याही जात, धर्म किंवा राजकीय पक्षाच्या आधारावर नाही, तर मानवतेच्या मूल्यांवर आधारित आहे. महिला अत्याचार, बालशोषण, पोलिस त्रास, भूमिहीनांचे हक्क, शासकीय अन्याय अशा अनेक प्रकरणांत संघटना पीडितांच्या पाठीशी उभी राहत आहे.

सत्य माहिती गोळा करणे, कायदेशीर सल्ला व मदत देणे, प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही संघटनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. समाजात समानता, न्याय व शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशा संघटनांचे योगदान अनमोल आहे.

“जर तुमच्यावर अन्याय, शोषण किंवा हक्कांची पायमल्ली होत असेल, तर राष्ट्रीय मानव अधिकार सेवा संघटना तुमच्यासाठी लढायला तत्पर आहे,” असे ठाम मत श्री. संजय लोहितकर राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकूलकर यांचे जवळ व्यक्त केले.

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!