मानस अॅग्रो साखर कारखाना जामणी कडुन ऊस तोडणी करीता शेतकर्‍यांची लूट

0

मदनी आमगाव/ गजेंद्र डोंगरे:

मदनी आमगाव परिसरात असलेल्या मानस अॅग्रो शुगर अॅण्ड पाॅवर लिमिटेड तर्फे ऊस उत्पादकांना खुप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून सदर जामणी साखर कारखाना बंद करण्यात आला असून पुर्ती साखर कारखाना बेला येथील साखर कारखान्यामध्ये जामणी साखर कारखाना परीसरातील ऊस गाळपासाठी पाठवण्यात येत आहे. त्यासाठी ऊस तोडणी यंत्राचा (हाॅर्वेस्टर) वापर केला जात आहे.परंतु सदर यंत्राचे कंत्राटदार ऊसाचा प्लाॅट तोडण्याकरीता शेतकर्‍यांकडुन हजारो रुपयांची मागणी करत असून पैसे न दिल्यास ऊसाच्या प्लाॅटवरुन ऊस न तोडता परत जात आहे. ऊसाची लागवड करताना बारा महिन्यामध्ये ऊसाची तोड करुन ऊस कारखान्यात गाळपासाठी जाने ही जबाबदारी कारखाण्याची असते व तसा करारनामा सुद्धा केला जातो. परंतु हाॅर्वेस्टर यंत्राच्याकंत्राटदाराने सर्व नियम पायदळी तुडवत पैसे लाटण्याचा घाट चालवला आहे हजारो रुपयांची मागणी केली जात असून शेतकरी पैसे देवू शकत नसल्याने कालावधी लोटल्यानंतरही शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस उभाच असल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे तरी कारखाना प्रशासनाने या गोष्टीचा विचार करून लवकर तोडगा काढावा व शेतकरी बांधवांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी कारखाना परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या कडुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!