🔥पैठण तालुक्यातील स्तनदा मातांची कुचंबना हिरकणी कक्षाची अंमलबजावणी नाही.
बीड़कीन -/पैठण शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.या मुख्य ठिकाणी सरकारी रुग्णालय,तहसील कार्यालय,विविध खाजगी रुग्णालय,पंचायत समिती,नगर परिषद,कृषी कार्यालय,एसटी महामंडळस विविध शासकीय व निमशासकीय कार्यालय आहे.कार्यालयात विविध कामासाठी व बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात पैठणला येत असतात.त्यामुळे स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करण्यासाठी ‘हिरकणी कक्ष’ असणे आवश्यक आहे हिरकणी कक्ष’ या योजनेच्या संदर्भात योग्य जाहिरात व प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या प्रमुखांना वेळच्या वेळी सूचना करण्यात आल्या असल्या तरी या योजनेचा अधिक प्रसार होऊन लाभ होऊ शकला असता.मात्र तसे पैठणमध्ये झालेले दिसत नाही.तान्हुल्या बाळाची व त्या अनुषंगाने मातांची कुचंबना होत आहे.,हिरकणी कक्ष स्थापन करण्यासाठी संबंधित अधिनस्त कार्यालय व तहसिल कार्यालयातील अधिकारी यांना आदेश पारित करण्यात यावे हिरकणी कक्ष स्थापन करण्यासाठी पण पैठण तालुक्याला लाभलेले तहसीलदार या बाबतीत निवेदन दिले तर त्यावर साधा नियमानुसार पत्रव्यवहार देखील करत नाही.महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आदेश दिले पण अंमलबजावणी केली जात आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे असे मत नागरिकामधुन व्यक्त केले जात आहे .ही बाब लक्षात घेता २०१४ मध्ये तत्कालीन महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर भर देत या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे असे आदेश पुन्हा दिले होते.मात्र ते आदेश सरकारी व निमसरकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी धाब्यावर बसविले असल्याचे पैठण तालुक्यात पहावयास मिळत आहे.अशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का वाढत आहे. परंतु,कार्यालयांमधील वातावरण आणि सुविधा महिलांसाठी पूरक अशा नाहीत.