मिसरूड न फुटलेल्या तारुनांनाही ‘चंगळ’ चे वेड
प्रतिनिधी / वर्धा:
जुगार आणि अवैध धंद्याना वर्ध्यात थाराच नसेल असे अनेकांना वाटतेय. त्याचे कारणही तसेच आहे, वर्ध्यात दारूला ‘बंदी’ आहे. पण प्रवेश नसलेली।दारू वर्ध्यात धूम करते आहे. मग जुगार हा तर जोरात असणार यात नवल नाही. पण सध्या वर्धा जिल्ह्यात ‘चंगळ’ या जुगार प्रकाराने चांगलीच चंगळ केली आहे. ज्यांच्या ओठावर मिसरूड देखील फुटलं नाही असे विद्यार्थी दशेतील मुलं ‘चंगळ’ जुगाराच्या आहारी गेले आहेत.
शहराच्या ठिकाणी सुरू असलेला जुगाराचा धंदा आता ग्रामीण भागात देखील पोहचला आहे. मिसरूड न फुटलेले जुगारात पालखट मांडून बसलेले तरुण जर अशा जुगाराच्या आहारी जात असतील तर मग स्थानिक यंत्रणा काय करते असाच प्रश्न निर्माण होतो. दहा घराचा हा खेळ सर्वत्र प्रचलित होत असताना हा खेळ जिल्ह्यात आला कुठून आणि आणला कुणी? हा संशोधनाचा।विषय आहे. सेलू शहरात आतापर्यत हा जुगार सुरूच नव्हता. गेल्या काही दिवसात या जुगाराने सेलू येथे धूम मचविली. आलेला हा जुगार कसा खेळला जातो, याचीच उत्सुकता अनेकांना लागून होती. अनेकांनी जुगाराच्या अड्ड्यावर पोहचत जुगाराकडे डोकावून पाहत उत्सुकता देखील पूर्ण केली.
हायप्रोफाईल ‘चंगळ’ जुगारावर छापा; सोळा जुगारी ताब्यात
सेलूत पोलिसांनी शहरातील मेडिकल चौकात हायप्रोफाईल अड्ड्यावर छापा टाकला. या छापेमारीमध्ये तब्बल 15,920 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. सेलूच्या जयस्वाल टॉकीज च्या आवारात हा जुगार अड्डा सुरु होता.
या ठिकाणी दररोज जुगार सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली . त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत अखेर या जुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण 16 जुगाऱ्याना ताब्यात घेण्यात आले होते.
कारवाईत काय काय जप्त?
हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण 15,920 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या जुगारात वसीम इशाक शेख 30, केळझर, आशिष भरत नेहारे 23 केळझर, अक्षय राकेश रंगारी 25 सेलू, आकाश दाभाडे 32 सेलू, विनोद अशोक सावरकर 32 सेलू, मंगेश सुरेश बोकडे 25 सेलू, अनिकेत अशोक वागोदे 25 सेलू, हर्षल ज्ञानेश्वर नखाते 25, राजेंद्र रामदास कांबळे 38 मोर्चापूर, सचिन अशोक लाखे 25 सेलू, शुभम विजय धोंगडे 28 शेलु, अनिकेत राजू साठवणे 28 सेलू, सतीश नामदेव साठवणे 42 रेहकी, लक्ष्मण बावणे, वांणरखेडा, अमोल भास्कर साठवणे 21 सेलू, इम्रान उर्फ इरफान कलाम शेख 40 केळझर,या यासोबत पोलिसांनी जुगाराचं साहित्यही हस्तगत केलं आहे.