मेट्रोमुळे अरुंद रस्ता… त्यावरच मुरूमचा डंप — राजीव नगरात जीवाशी खेळ; वानाडोंगरी नगरपरिषद प्रशासन निष्क्रिय!…

0

🔥हाच तो मेट्रोमुळे अरुंद रस्ता… त्यावरच मुरूमचा डंप — राजीव नगरात जीवाशी खेळ; वानाडोंगरी नगरपरिषद प्रशासन निष्क्रिय!
हिंगणा -/ रोडवरील वानाडोंगरी राजीव नगर, बुद्ध विहार परिसरात मेट्रोच्या कामामुळे आधीच रस्ता धोकादायकरीत्या अरुंद झाला असताना त्याच रस्त्यावर सर्रास मुरूमच्या गाड्या उतरवून ढिगारे टाकले जात असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे नागरिक, विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि पादचारी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अपघात घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर वानाडोंगरी नगरपरिषद हद्दीत येतो. तरीही रस्त्यावर मुरूम टाकण्याचा हा प्रकार उघडपणे सुरू असताना नगरपरिषद प्रशासन, अभियांत्रिकी विभाग आणि संबंधित अधिकारी कुठे आहेत, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. मेट्रो कामामुळे आधीच रस्ता अर्धा झाला असताना उरलेल्या जागेवर बांधकाम साहित्य टाकणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेशी थेट खिलवाड असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

“रस्त्यावर मुरूम टाकण्यास परवानगी कोणी दिली? कोणत्या अधिकाऱ्याच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे?” अशी तीव्र प्रतिक्रिया परिसरातून उमटत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तात्काळ मुरूम हटवून रस्ता मोकळा न केल्यास वानाडोंगरी नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा कंत्राटदारांची सोय महत्त्वाची ठरवणारे प्रशासन नेमके कोणासाठी काम करत आहे, असा संतप्त सवाल आता राजीव नगर परिसरातून जोर धरू लागला आहे.

        गजानन ढाकुलकर               साहसिक News-/24 हिंगणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!