मोटार चोरून नेणाऱ्या चोरट्यांना आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
🔥तारासावंगा येथील घटना
आष्टी शहीद-/ तालुक्यात शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य चोरीला जात असून या चोरट्यांना पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असताना तारासावंगा येथील एका शेतकऱ्याची मोटर चोरीला गेली असता तक्रार दाखल होतात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना चेअर बंद केले.सविस्तर वृत्त असे की तालुक्यात गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्याच्या शेतातील शेती विषयी साहित्य स्प्रिंकलर पाईप मोटर यासह साहित्य चोरीला जात असून अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. आष्टी तालुक्यातील तरासावांगा हे गाव अमरावती आणि नागपूर सीमेला आहे .तारासावंगा गावातील शेतकरी अजय नारंगे यांची नदीवर बसवलेली साडेसात एचपी ची मोटर दिनांक 8 डिसेंबर 2024 ला गावातीलच भामट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली यासंदर्भात फिर्यादी अजय नारंगे यांनी आष्टी पोलीस स्टेशनला तोंडी रिपोर्ट देऊन तक्रार नोंदवली असता आष्टी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता चोरट्यांनी मोटर वरुड मध्ये बाजारात विकण्यास नेल्याची माहिती मिळाली. त्याचदरम्यान वरुड पोलिसांना या संदर्भात माहिती देत वरुड पोलीस प्रशासनाच्या साह्याने चोरीतील आरोपी अनिल खंडाळे, दिनेश गुडदे राहणार तारासावंगा यांना ओलिताच्या मोटारसह आष्टी पोलिसांनी अटक केली. या दोन्ही चोरट्यापासून मोटर व मोटरसायकल सह मुद्देमाल अंदाजे एक लाख 25 हजार जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डी .बी. खंडेराव, आष्टीचे पोलीस निरीक्षक बबन फुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे, शिपाई प्रवीण बंडवाल, लिंगा पारेकर,राजेश धाये, चालक अश्विन चव्हाण यांनी केली.
