मोहन अग्रवाल हे समाजासाठी मदतीचे आशास्थान : आमदार राजेश बकाने…

0

🔥मोहन अग्रवाल हे समाजासाठी मदतीचे आशास्थान : आमदार राजेश बकाने.

देवळी -/ गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांकरिता व गरजू नागरिकांसाठी मदतीचे आशास्थान ठरणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहन अग्रवाल होत, असे प्रतिपादन राजेश बकाने यांनी केले.
ते देवळी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित व्हॉइस ऑफ मीडियाच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अग्रवाल यांच्या कार्याचा गौरव हा केवळ सन्मान नसून भावी पिढीसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारा आहे. जिल्ह्यातील विशेष व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी हिंगणघाट चे आमदार समीर कुणावार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनासाने, नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण ठाकरे, पुलगावच्या नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर, हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, सिंधी रेल्वेच्या नगराध्यक्ष राणी कालोडे,न. प. देवळीचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव राणा रणनवरे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, व्हॉइस ऑफ मीडिया विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर, विदर्भ कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, जिल्हाध्यक्ष एकनाथ चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
अग्रवाल यांना उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी हिंगणघाट येथील कोहिनूर वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीतर्फे देण्यात आलेल्या कोहिनूर अवॉर्ड 2022 ने मोहन अग्रवाल यांना सन्मानीत करण्यात आले होते त्याची आठवण आमदार समीर कुणावार यांनी करून दिली.
मोहन अग्रवाल यांना मिळालेल्या या सन्मानामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे संचालन निलेश पिंजरकर यांनी तर आभार जिल्हाध्यक्ष एकनाथ चौधरी यांनी मानले कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              सागर झोरे                         साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!