यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्याला पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी वणी ठाणेदार श्याम सोनटक्केला हप्ता वसुलीचे दिले बळ?
विषेश प्रतिनिधी/ यवतमाळ:
स्वतःला इमानदार व भ्रष्टाचार मुक्त समजणारे यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्या राज्यात सर्वात जास्त क्राईम रेट वाढला असून दररोज खून, दरोडा, अपघात घडत आहे. याची सर्वच जबाबदारी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांची आहे. कारण मोठ्या प्रमाणात हप्ता वसुलीचे काम डॉ. भुजबळ यांचे विश्वासू सहकारी वणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के करीत असल्यामुळे गुन्हेगारावर ‘साहेबांचा’ वचक राहिला नाही. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी पोलीस गणवेश खरेदीमध्ये कोट्यावधी रुपयांचा ‘मलिंदा’ (लाच) खाल्ल्यामुळे पोलिस कर्मचारी वर्गात व त्यांचे परिवारात भ्रष्ट पोलीस अधीक्षक अशी प्रतिमा भुजबळांची तयार झाल्यामुळे पोलिस कर्मचारीसुद्धा आपले जेवढे काम आहे, तेवढेच काम करीत आहे. त्यामुळे क्राईम रेट वाढत आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार डॉ. दिलीप भुजबळ यांनी हाती घेतल्यानंतर 6 महिने भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. यामुळे यवतमाळ करानीं डॉ. दिलीप भुजबळ यांना डोक्यावर घेतले. परंतु 24तास यवतमाळ करांच्या रक्षणाकरिता आपला जीव पणाला लावणारे पोलीस बांधवांचे गणवेश खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा डॉ. दिलीप भुजबळ यांनी केल्यामुळे यवतमाळ पोलिसांच्या कुटुंबात पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पोलिस अधीक्षक म्हणून गणल्या जात आहे. त्याचप्रकारे पोलीस कल्याणी निधीही पोलीस कुटुंबाच्या अडीअडचणीला आर्थिक पाठबळ देणारी कुटुंब संस्था आहे. परंतु या पोलिस कल्याण निधीवर डोळा ठेवत पोलिस कल्याण निधीच्या मालकीचा पेट्रोल पंप जेव्हा ‘बंद’ केला, त्यावेळी 45 लाख रुपये रक्कम संबंधित अधिकाऱ्यांनी डॉ. दिलीप भुजबळ यांच्या बंगल्यावर पोहोचता करून दिली. त्या निधीचे काय झाले याबाबत दि. 20 ऑक्टोंबर 2021 रोजी दैनिक सहासिक अंकात “पोलिस कल्याण निधीच्या 45 लाख रुपये पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी काम केले? पोलीस कर्मचाऱ्या चर्चा” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून सदर बातमी खोटी असेल तर डॉ. दिलीप भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करण्याची विनंती वजा सूचना दैनिक सहासिक वृत्तपत्राने केली आहे. पोलीस कल्याण निधी अंतर्गत पोलीस मुख्यालयातजवळील पेट्रोल पंप 10 ते 20 लाख रुपयांच्या कमिशन साठी दिला. खाजगी पेट्रोल पंप मालक लाठीवाला याच्या घशात घालून पोलीस कल्याण निधीला दरमहिन्याला 2 ते 5 लाख रुपये नफा ‘डॉ. भुजबळ’ यांच्या भ्रष्टप्रवृत्ती मुळे बंद करण्यात आला. साहेबांचा अत्यंत विश्वासू जातभाई व हप्ता वसुलीत दरबेज असणाऱ्या श्याम
सोनटक्के यांना सर्वात जास्त अवैध कमाई करून देणारे पोलीस स्टेशन देऊन ‘श्याम सोनटक्के’ हाच माझा हप्ता वसुलीत माहीर असलेला सचिन वाझे आहे, यावर ‘भुजबळ’ नी शिक्कामोर्तब केले. तसेच दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रात ‘उज्वल सोनटक्के’ या पत्रकारानीं “यवतमाळ जिल्ह्यात अवैध वाहतुकीला कुणाचे ‘भुज’ बळ? ” ही बातमी प्रकाशित केली. या बातमीचे अवलोकन केले असता जिल्हा वाहतूक शाखेचे तत्कालीन ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकदाराकडून मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली करीत असल्याचे वृत्त दैनिक सहासिकणे प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत डॉ. दिलीप भुजबळ यांनी पांढरकवडा येथील आपला विश्वासू ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना 8 महिने अतिरिक्त पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये ठेवून नंतर जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी देऊन डॉ. दिलीप भुजबळ यांनी वाझे क्र. 2 चे मानकरी रामकृष्ण मोहल्ले यांच्याकडे अवैध वाहतूक वसुलीची जबाबदारी दिली. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाहतूक प्रवाशांची जीवघेणी यात्रा ठरत आहे. वणी पोलीस स्टेशनची जबाबदारी ठाणेदार शाम सोनटक्के यांना देताच ‘वणीत’ खुलेआम अवैध धंदे सुरू करण्यात आले आहे. अवैध धंदे करणाऱ्यात स्पर्धा सुरू केली असून जो अवैध धंदे करणारा जादा रक्कम देईल, त्याच व्यावसायिकाच्या धंद्याला परवानगी मिळत आहे.