🔥हाच तो लाच खाण्यात नंबर १ असलेला ट्रॅफिक पोलीस रवींद्र चव्हाण
🔥यवतमाळ पोलीस दलात भ्रष्टाचाराचा ‘महास्फोट’! पाच वर्षांच्या ‘SP’च्या पगारापेक्षा ‘वाहतूक शिपाया’ची माया मोठी;
🔥कोट्यवधींच्या मालमत्तेची ACB चौकशी करा!
यवतमाळ -/रक्षकच जेव्हा भक्षक बनतो आणि वर्दीच्या आड भ्रष्टाचाराचे कुरण चरतो, तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागतो. यवतमाळ पोलीस दलातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने भ्रष्टाचाराच्या जोरावर कमावलेली ‘गडगंज’ मालमत्ता सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. रवींद्र तुकाराम चव्हाण (बक्कल नंबर १०३५) असे या संशयास्पद शिपायाचे नाव असून, त्याची संपत्ती पाहून मोठ्या अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले आहेत. एका जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाच्या (SP) पाच वर्षांच्या एकूण पगारापेक्षाही जास्त संपत्ती या शिपायाने कशी जमा केली? हा यक्षप्रश्न आता उपस्थित होत असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याची तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
रवींद्र चव्हाण हा २००२ मध्ये पोलीस दलात भरती झाला. सुरुवातीची काही वर्षे सामान्य सेवा केल्यानंतर, गेल्या अनेक वर्षांपासून त्याने जाणीवपूर्वक वाहतूक शाखेत आपले बस्तान बसवले आहे. वाहतूक शाखा म्हणजे जणू ‘अवैध वसुलीचे केंद्र’ अशी ओळख त्याने निर्माण केली असून, रस्त्यावरील वाहनचालक, अवैध वाहतूकदार आणि व्यापार कडून मिळणाऱ्या खिरापतीतून त्याने स्वतःची वैयक्तिक तिजोरी भरल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने होणाऱ्या वसुलीत या शिपायाचा अर्ध्याहून अधिक वाटा असल्याची चर्चा पोलीस दलातच दबक्या आवाजात सुरू आहे.
पुसद तालुक्यातील कोपरा या मूळ गावच्या असलेल्या या शिपायाने यवतमाळ शहरात आणि परिसरात मालमत्तेचे जाळे विणले आहे. त्याच्याकडे असलेली मालमत्ता एखाद्या बड्या उद्योगपतीलाही लाजवेल अशी आहे:
यवतमाळ शहरात रवींद्र चव्हाण याच्या नावे दोन मजली आलिशान घर आहे ,पत्नीच्या नावे ५ प्लॉट: सरकारी नियमांची पायमल्ली करत, भ्रष्टाचाराचा पैसा पांढरा करण्यासाठी पत्नीच्या नावे यवतमाळच्या मोक्याच्या ठिकाणी तब्बल ५ प्लॉट खरेदी करण्यात आले आहेत.
येरद जोडमोहा परिसरात पत्नी विना रवींद्र चव्हाण यांच्या नावे १० एकर सुपीक शेती खरेदी करण्यात आली आहे.
घरासमोर एक ट्रॅक्टर, एक आलिशान चारचाकी, एक दुचाकी आणि ॲक्टिव्हा असा वाहनांचा ताफा उभा असतो.
घरात अंदाजे २० तोळे सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंची मोठी साठवणूक असल्याचे बोलले जाते. यवतमाळमध्येच एक मोठे किराणा दुकान थाटून त्यातून उत्पन्नाचा दुसरा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुलांच्या शिक्षणावर लाखोंचा खर्च; पैसा येतो कुठून?
एक साधा पोलीस शिपाई, ज्याचा पगार मर्यादित आहे, तो आपल्या दोन मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दरमहा आणि वर्षाला लाखो रुपये खर्च करत आहे. या मुलांच्या महागड्या राहणीमानाचा आणि शिक्षणाचा खर्च पाहता, हा सर्व पैसा रक्ताचा घाम गाळून कमावलेला नसून सामान्य जनतेला लुटून कमावलेला आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
रवींद्र चव्हाण याने वाहतूक विभागात राहून नेमकी किती माया जमवली आहे, याचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य माणूस दिवसाला १००-२०० रुपयांसाठी राबत असताना, कायद्याचे रक्षक म्हणवणारे हे ‘वर्दीतील दरोडेखोर’ जनतेची लूट करत आहेत. जर एका शिपायाकडे एवढी मालमत्ता असेल, तर त्यामागे किती मोठे रॅकेट कार्यरत असेल?
१. रवींद्र तुकाराम चव्हाण याच्या सर्व मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मार्फत खुली चौकशी व्हावी. २. त्याच्या सेवापुस्तिकेची तपासणी करून, त्याने एवढ्या वर्षात मालमत्तेचे जे विवरण दिले आहे, त्याची सत्यता पडताळली जावी.
३. अवैध वसुलीतील त्याचे आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संबंध उघड करावेत.
जर या भ्रष्ट शिपायावर कठोर कारवाई झाली नाही, तर पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईलच, शिवाय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य खचेल. आता चेंडू गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दरबारात आहे. या ‘भ्रष्टाचार सम्राटाची’ गय केली जाणार की त्याला खाकीतून बेदखल केले जाणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
”भ्रष्टाचाराच्या या वाळवीला ठेचून काढल्याशिवाय पोलीस दलाची शुद्धी होणार नाही!”(क्रमशः)