यवतमाळ हादरले! सत्तेची मस्ती की गुंडशाही? सरपंचाच्या पतीचा अतुल देशमुख यांनी एक महिलेवर विनयभंग केला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी!..

0

🔥यवतमाळ हादरले! सत्तेची मस्ती की गुंडशाही? सरपंचाच्या पतीचा अतुल देशमुख यांनी एक महिलेवर विनयभंग केला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी!

​आर्णी -/ दि 20मार्च जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सत्तेच्या आणि पैशाच्या माजानी परिसीमा ओलांडली आहे. गरिबांच्या कष्टावर डल्ला मारून आणि अवैध धंद्यातून वारेमाप संपत्ती गोळा करणाऱ्या एका ‘पांढरपेशा’ गुंडाने गावात दहशत निर्माण केली आहे. चक्क ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करणे आणि संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्यापर्यंत या नराधमाची मजल गेली आहे.

​नेमकं प्रकरण काय?
​मिळालेल्या माहितीनुसार आर्णी पोलीस स्टेशन तक्रारीनुसार (FIR), आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत परसोडा येथे ही घटना घडली. गावातीलच तथाकथित प्रभावशाली व्यक्ती अतुल प्रकाश देशमुख आणि अमोल प्रकाश देशमुख यांनी पीडित महिलेच्या घरात घुसून धिंगाणा घातला. केवळ शाब्दिक चकमक नाही, तर पीडितेचा हात पकडून तिचा विनयभंग करण्यात आला. इतकेच नव्हे, तर जेव्हा पीडितेचे पती आणि सासरे (वय ८० वर्षे) तिथे आले, तेव्हा त्यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत “तुम्हाला जिवंत मारून टाकू” अशी उघड धमकी देण्यात आली.
​अवैध संपत्तीचा माज आणि गावकऱ्यांची सुरक्षा धोक्यात
​गावातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडे असलेल्या अवैध संपत्तीमुळे त्यांची दहशत इतकी वाढली आहे की, सामान्य माणसाने जगायचे कसे? कायद्याचा धाक उरला नसल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सत्तेच्या सावलीत राहून स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजणाऱ्या या ‘अण्णां’ना कायद्याचा हिसका दाखवण्याची वेळ आली आहे.
​पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष
​या प्रकरणी आर्णी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७४, ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद राजाराम जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, आरोपींचा राजकीय वरदहस्त आणि संपत्ती पाहता पोलीस निष्पक्ष तपास करणार का? पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? की पुन्हा एकदा पैशाच्या बळावर हे प्रकरण दाबले जाणार? असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.
​क्रांतिकारी इशारा: गरिबांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या आणि महिलांवर हात टाकणाऱ्या या विकृत प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त झाला नाही, तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही! प्रशासन आता तरी डोळे उघडणार का.? (क्रमशः)

      ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 अर्णी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!