सेलू /तालुक्यातील हिंगणी येथे ३० मार्च २०२४ ला यशवंत विद्यालय हिंगणी येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विषय होता पर्यावरणाचे महत्त्व. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व प्राप्त होण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत जे विविध कार्यक्रम राबविले जाते त्यामध्ये यशवंत विद्यालय हिंगणी येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग घेतला त्याचप्रमाणे या स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय असे पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ. गोरडे मॅडम, पर्यवेक्षक फासगे सर, राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक इंगोले सर व परीक्षक म्हणून गावंडे सर हे उपस्थित होते.