🔥गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.श्री गुरुदेव सेवा मंडळ, वर्धा,धुलिवंदन उत्सव समितीचे आयोजन.
वर्धा -/ चिकाटी कौशल्य व बुद्धिमत्ता या गुणांचा स्वीकार करीत भविष्यात यशासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे आणि ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असावे असे प्रतिपादन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे यांनी केले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ वर्धा, धुलिवंदन उत्सव समितीच्या वतीने मातोश्री सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन पिपरी ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली गौळकर यांनी केले. अध्यक्षस्थानी अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमच्या वर्धा जिल्हा महिला सेवा अधिकारी अनिता कडू, प्रमुख अतिथी वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.पंकज भोयर, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ.सचिन पावडे, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक जयंत कोहळे, पिपरी ग्रामपंचायतच्या सदस्य विद्या कळसाईत,कीर्ती खंडारे, समाजसेवक सुनील बुरांडे, वर्धा कला महोत्सव समितीचे संदीप चिचाटे, आधारवड संस्थेचे चंद्रशेखर दंडारे, नितेश कराळे, श्री गुरुदेव सेवा मंडळ धुलीवंदन उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ठाकरे, कार्याध्यक्ष प्रकाश राऊत, संजय वाके, अरुणकुमार गोंधळे, सुभाष भोयर, जयवंत भालेराव, सुनील गायकवाड, पुण्यदास चरडे, उत्तमराव फरताडे, ज्ञानेश्वर खडसे, नानाजी ढोक, सुधीर इसासरे, प्रल्हाद गोलाईत, उत्तमराव परिमल,गोपाल वाटकर ओंकार सामुद्रे, मोरेश्वर फोलाने यांची उपस्थिती होती.
प्रारंभी अधिष्ठानाचे पूजन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते दहावी,बारावी, नवोदय तसेच पदवी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पिंपरी ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता विषयक कार्य करणारे कर्मचारी यांना संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीगुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांना सहकारी मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कला व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय योगा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी वेदांती पवार, महालक्ष्मी तिमाने,श्रीहरी तिमाने यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरव करण्यात आला. त्यांनी उपस्थितासमोर योग प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय ठाकरे, संचालन मनीष जगताप, आभार चंद्रकिशोर धरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल भोगे,भास्कर पोंगडे, निलेश चौधरी, बंडू पाळेकर, प्रकाश सावळीकर, दिवाकर उभाड, कल्पना भुयार, लीला सावळीकर, वनमाला चौधरी, कृष्णा सोलव, प्रज्वल ठाकरे, सुधाकर भोवरे,सुनिल नरांगे, गणेश पाटील, रितेश तेलंग तसेच गुरुदेव सेवक यांनी सहकार्य केले.