युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी (तिरंदाजी) मध्ये पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांनी कास्य पदक पटकावून केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक यांचे हस्ते सत्कार
प्रतिनिधी/वर्धा :
दिनांक ८ ऑक्टोंबर ते १० ऑक्टोंबर या दरम्यान गोवा राज्यातील मडगाव येथे ४ थी युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धा-२०२१ आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस अर्चरी संघाने सहभागी होऊन एकुण १३ पदकांसह उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. सदर स्पर्धेमध्ये वर्धा जिल्हयातील महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे हिने कास्य पदक पटकावले असुन वर्धा जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक केले आहे. सिमा दुबे ही कबड्डी या खेळाची उत्कृष्ठ खेळाडु असुन महाराष्ट्र पोलीस संघाचे राज्यस्तरावर सुद्धा प्रतिनिधत्व केलेले आहे. सिमा दुबे ही सन २०१३ मध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झाली असुन सध्या पोलीस स्टेशन पुलगाव येथे नेमणुकीस आहे.
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा पियुष जगताप यांनी महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कास्य पदक प्राप्त खेळाडु हिने तिचे यशाचे श्रेय मार्गदर्शक व प्रशिक्षकांसह पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांना दिले आहे.