वर्धा /जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून रणरागिणी मंच हिंगणघाट द्वारा स्नेहमिलन आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून रणरागिणी मंचच्या महाराष्ट्र अध्यक्षा रणरागिणी संगीता बढे या होत्या.कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आधुनिक युगातील सावित्री आदरणीय जयश्री ताई वाकडे या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून रणरागिणी मंचच्या हिंगणघाट शाखेच्या अध्यक्षा रणरागिणी कल्पना भोयर आणि मंचच्या सचिव सारिका ठोंबरे या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत करण्याकरिता रणरागिणी लीना शेंडे हिने स्वागत नृत्य सादर केले.यावेळी या आधुनिक युगातील सावित्री आदरणीय जयश्री ताई वाकडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जयश्री ताई वाकडे यांनी 2003 मध्ये आपल्या पतीला किडनी देवून त्यांचे प्राण वाचवले……..अशा या रणरागिणी चा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.पृथ्वीचे दर्शन घडवणारी आई, घासातला घास भरवणारी बहीण,स्वतः चे दुःख विसरून पतीच्या दुःखात सहभागी होऊन संसार फुलवणारी पत्नी,आई नंतर आईची जागा घेणारी आपली लेक आणि आपले मन जाणून घेवून संकटात धीरगंभीर पणे पाठीशी उभी राहणारी आपली मैत्रीण या सर्व स्त्री शक्तीला शिरसाष्टांग नमस्कार करून संगीता बढे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात केली. त्या पुढे जाऊन म्हणाल्या की,संघटन करणे हे खूप सोपे आहे पण ते संघटन टिकवून ठेवणे कठीण आहे.रणरागिणी मंचच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे आणि त्या व्यक्त व्हायला लागल्या आहे. स्त्री ही वेगळी आहे जेव्हा तू डोळे मिटून स्वतः ला शोधशील तेव्हा तुला कळेल की तू खास आहे फक्त तिला ते ओळखावं लागते.जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात अनेक प्रकारची संकट येतात ते पार करून पुढे निघालो तरच यश हातात आहे.यावेळी समाजातील स्त्रियांनी वेगवेगळ्या नृत्य शैली सादर केल्या.यात एकल नृत्य,समूह नृत्य सादर केले.ज्ञान प्रश्न मंजुषा घेण्यात आली,कोडे विचारण्यात आले.सगळ्यांना छान छान बक्षिसे देण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंगणघाट शाखेच्या सचिव रणरागिणी सारिका ठोंबरे यांनी केले तर संचालन रणरागिणी अनुश्री कोपरे हिने केले.सांस्कृतिक सत्राचे संचालन रणरागिणी सरोज शेळके केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना भोयर,वंदना भोयर,सारिका ठोंबरे,सारिका भोयर,रीता पूसदेकर,श्वेता धोटे,प्रतिभा धोटे,प्रतिभा पडोळे,रश्मी खिळेकर,प्रियंका पुलगमकर आणि सदस्य यांनी प्रयत्न केले.