राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय पुलगावचे कलाशिक्षक अजय वानखडे यांचा सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन…

0

पुलगाव / राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय पुलगावचे कलाशिक्षक अजय एम.वानखडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सौ मनीषा ए.वानखडे तसेच शाळा प्रमुख महेंद्र जाधव उपस्थित असून सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.शाळा प्रमुख यांनी अजय वानखडे यांचा शाल व श्रीफळ देऊन तसेच सौ मनीषा अजय वानखडे यांचा श्रीमती रत्ना झाडे यांनी साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.शाळा प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती यांनी शाळेला चांगली सेवा दिली असून माणूस कधीही सेवानिवृत्त होत नसून सेवा ही अखंड आयुष्यभर सुरू असते असे प्रतिपादन केले.प्रमुख पाहुणे सौ मनीषा वानखडे यांनी सुद्धा सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा रेणुकाताई आर.कोटंबकार व संस्था सचिव रवींद्र एन.कोटंबकार यांनी सत्कारमूर्ती अजय वानखडे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत नासरे व आभार प्रदर्शन मंगेश डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाला दिलीप थुल,उदय महाजन,गणेश डोंगरे सौ विद्या जाधव,श्रीमती रत्ना झाडे,श्रीमती आवडता मेश्राम उपस्थित होते.

साहसिक न्यूज/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!