राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धेचे सेलूत दिमाखात उद्घाटन.! सात विभागांतील संघांचा सहभाग; पुणे–नागपूर सामन्याने स्पर्धेला रंगत….

0

🔥राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धेचे सेलूत दिमाखात उद्घाटन.!
🔥सात विभागांतील संघांचा सहभाग; पुणे–नागपूर सामन्याने स्पर्धेला रंगत.

सेलू -/ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, वर्धा जिल्हा लंगडी असोसिएशन, सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू व स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी अकरा वाजता दीपचंद चौधरी विद्यालयात दिमाखात पार पडले. या स्पर्धेच्या माध्यमातून सेलू पुन्हा एकदा राज्याच्या क्रीडा नकाशावर ठळकपणे झळकले आहे.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकार उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे (वंजारी) होत्या. यावेळी महाराष्ट्र लंगडी असोसिएशनचे सचिव चेतन पागावाड, वर्धा जिल्हा लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष निशिकांत मेघे, सेलू शिक्षण मंडळाचे नविनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी, त्रिशूल चौधरी, नगरपंचायत गटनेते शैलेंद्र दफ्तरी, दिलीप सारस्वत, योगेंद्र राठी, भाऊराव लोणकर, सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष ॲड. रामप्रसाद लिल्हारे, उपमुख्याध्यापिका डॉ. कल्पना मकरंदे, जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव अनंत भाकरे, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे, उपाध्यक्ष भारत घवघवे, सचिव यशवंत वांदिले, विजय माहुरे, संघर्ष जाधव, पंकज तडस, राजेश वरटकर आदि मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे व मुंबई या सात प्रमुख विभागांतील संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटनानंतर लगेच पुणे व नागपूर संघातील चुरशीच्या सामन्याने स्पर्धेला रंगत आली. मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला, तर उत्कंठावर्धक सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, शिस्त व खिलाडूवृत्ती रुजावी, हाच या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे संयोजक सागर राऊत यांनी यावेळी सांगितले. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव अनंत भाकरे व सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष ॲड. रामप्रसाद लिल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक मिथुन हांडे व शिक्षिका जयश्री चव्हाण यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लंगडी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!