वर्धा -/कथित बाबा रामगिरी महाराज यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांचे विषयी अपशब्द काढल्याने जिल्ह्यातील मुस्लिम सोशल फोरम व महाविकास आघाडी सर्व पक्षाच्यावतीने.५ सप्टेंबर रोजी वर्धा येथे धरणे आंदोलन करण्यात आले.काही दिवसांपुर्वी नाशिक येथे रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर अभद्र वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात महाराजांच्या वक्तव्यांचा निषेध होऊ लागला आहे. ५ सप्टेबर रोजी वर्धा येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम तसेच हिंदू बांधव स्थानीक महात्मा गांधी चौकात एकत्रित येऊन रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला,त्याचबरोबर अहमदनगर येथे निलेश राणे यांनी मुसलमान बांधवांच्याविरोधातचे वक्तृत्व केले. राणे यांचाही निषेध त्याच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावा, यासाठी काल संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने धरणे आंदोलन केले त्या आंदोलनात वर्धा जिल्ह्याचे खा.अमर काळे तसेच काँग्रेसचे शेखर शेंडे, काँग्रेसचे अभुदय मेघे, बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, माजी आमदार प्रा.राजू तिमांडे , माझी नगराध्य पंढरी कापसे, इत्यादी अनेक नेते मंडळीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.