रामगिरी महाराज तसेच निलेश राणे यांच्या वक्तव्याचा हिंगणघाटात निषेध….

0

हिंगणघाट -/ कथित बाबा रामगिरी महाराज यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांचे विषयी अपशब्द काढल्याने स्थानिक मुस्लिम बांधवांचे वतीने आज दि.१३ रोजी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
काही दिवसांपुर्वी नाशिक येथे रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर अभद्र वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात महाराजांच्या वक्तव्यांचा निषेध होऊ लागला आहे. आज दि.१३ सप्टेबर रोजी वर्धा येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी स्थानीक उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकत्रित येऊन रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला, त्याचबरोबर अहमदनगर येथे निलेश राणे यांनी मुसलमान बांधवांच्याविरोधातचे वक्तृत्व केले. राणे यांचाही निषेध त्याच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी आज दि.१३ रोजी मुस्लिम समाजाचेवतीने कारवाई करीता निवेदन देण्यात आली.
यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!