🔥रामदास बाबा..जय जय रामकृष्ण हरी..च्या गजरात दुमदुमणार हळद गांव नगरी.
🔥विविध धार्मिक कार्यक्रम.गोपालकालाज्ञव महाप्रसादाचे आयोजन.
🔥श्री संत अवलिया रामदास भाबा ५ वा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन.
समद्रपूर -/वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त व श्री संत अवलिया रामदास बाबा ५ व्या पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त दिनांक ०८/०२/२०२६/ ते १०/०२/२०२६/ पर्यंत सलग ३ दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ०८/०२/२०२६ रविवार ला ११:०० वाजता आद्य ग्रामगीताचार्य श्री रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठान नागपूर तर्फे आदर्श ग्राम निर्माण संमेलन
विषय माझी सुंदर शाळा (प्रथम गट वर्ग १ ते ४)
चित्रकला स्पर्धा
व व्दितीय गट वर्ग ५ ते ८ माझे आदर्श गाव चित्रकला स्पर्धा आणि
(वर्ग ९वी नंतर कोणीही सहभागी होऊ शकेल)विषय :- एक तरी ओवी अनुभवावी ग्रामगीतेची
आणि संध्याकाळी ६:०० वाजता बाल वारकरी भजन मंडळ समुद्रपूर यांचा हरीपाठ होईल आणि ठिक ८:०० वारकरी महीला भजन मंडळ हळदगाव यांचे भजन.दिनांक ९ तारखेला सकाळी ८: वाजता घट स्थापना श्री लाडे महाराज कानापूर यांचे हस्ते होईल सकाळी ११ वाजता ग्रामगीता पठन श्री सतीश महाराज बाभुळकर यांचं दुपारी २:०० वाजता बालगंधर्व हसा आणि खेळा शिक्षण घ्या स्पर्धा
३:०० वाजता जिच्या हाती पाळण्याची दोरी महीला स्पर्धा ४:०० वाजता होम पुजा आणि ६:०० पज्वल ज्योत हरीपाठ रात्री ८:०० वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य सुप्रसिद्ध किर्तनकार श्री पवनपाल महाराज वडाळीकर यांचे समाजप्रबोधन व दिनांक १०/०२/२०२६ सकाळी ९:०० वाजता भागवताचार्य हे.भ.प. श्री प्रशांतजी महाराज क्षिरसागर यांचे काल्याचे किर्तन आणि ११:०० वाजता
दिव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये परीक्षण करून बक्षीस वितरण करण्यात येईल एकूण ३० बक्षीस आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने देण्यात येणार आहे दिनांक १०/०२/२०२६ ला ४:०० वाजता महाप्रसाद होईल तरी भजन मंडळांनी सहभागी व्हावे असे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.