🔥राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हिंगणा विधानसभा अध्यक्षपदी डॉ. देवेंद्र कैकाडे यांची नियुक्ती.
हिंगणा -/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांनी हिंगणा विधानसभा अध्यक्षपदी डॉ. देवेंद्र कैकाडे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे हिंगणा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नियुक्तीनंतर बोलताना डॉ. देवेंद्र कैकाडे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षाची भूमिका आणि विचार पोहोचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच या नियुक्तीबद्दल त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि नागपूर ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांचे आभार मानले.
डॉ. कैकाडे यांच्या निवडीबद्दल सुभाष राऊत, नामेश्वर ढगे, सतीश काळे, योगेश ठाकरे, संतोष नरवाडे, अभिनव पांडे, पांडुरंग नागपुरे, कान्होपात्रा रोडे, सोनाली कैकाडे, निखिल दुरबुडे, स्वप्नील कैकाडे, दुर्गेश कावळे, अमर सातपुते यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या नेतृत्वात हिंगणा विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.