राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याला प्रेरित होऊन समाजसेवक बालु उर्फ जय वानखेडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

0

🔥राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा हिंगणघाट शहराध्यक्ष पदी बालू वानखेडे यांची नियुक्ती.

🔥पक्ष श्रेष्ठींने तातडीने निर्णय घेऊन केली नियुक्ती..

हिंगणघाट -/ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याला प्रेरित होऊन समाजसेवक बालु उर्फ वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. तसेच पक्षश्रेष्ठींने तातडीने निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हिंगणघाट शहराध्यक्ष पदी बालु वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.
हि नियुक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी केली.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, वासुदेवजी गौळकार, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस हिमायु मिर्झा बेग, प्रदेश सचिव अली अजानी, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जावेदभाई मिर्झा, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, शोहेब शेख, बबलू शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बालू वानखेडे हे भाजप पक्षात सक्रिय पदाधिकारी होते त्यांनी सामान्य जनतेवर होणारा अन्याय अत्याचार विरुद्ध अनेकदा आवाज उठून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या नियुक्तीने हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी चे संघटन मजबूत होईल असे मनोगत यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांनी व्यक्त केले.
नवनियुक्त शहराध्यक्ष बालु वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश, जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ टाकसाळे, माजी आमदार राजू तिमांडे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सभापती सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

ईकबाल पहेलवान साहसिक news-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!