राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त वानाडोंगरीत शेतकऱ्याचा सन्मान,नवसुभाऊ गवते यांना शुभेच्छा….

0

🔥राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त वानाडोंगरीत शेतकऱ्याचा सन्मान,नवसु गवते यांना शुभेच्छा.

 वानाडोंगरी -/ राष्ट्रीय शेतकरी दिन या पवित्र दिनानिमित्त वानाडोंगरी येथील माजी उपसरपंच तसेच आमगाव, देवळी, वायफड परिसरातील प्रगतिशील शेतकरी  नवसु हवसु गवते यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
हिंगणा शहर येथील राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर यांनी गवते यांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रतिक्रिया देताना नवसुभाऊ गवते म्हणाले की,“मी एक प्रगतिशील शेतकरी असून, मला राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शुभेच्छा देणारे ढकुलकरजी आपण पहिले मान्यवर आहात.”
या शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त करत गदगद होऊन श्री. ढाकुलकर यांचे आभार मानले.

याप्रसंगी बोलताना गजानन ढाकुलकर यांनी शेतकऱ्यांच्या योगदानावर प्रकाश टाकत सांगितले की,
*“शेतकऱ्याला ‘जगाचा पोशिंदा*’ असे म्हटले जाते. शेतकरी नसेल तर मानवी अस्तित्वालाच अर्थ उरणार नाही. शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्यामुळेच सर्वसामान्यांच्या ताटात अन्न येते, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे कैवारी स्व. चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
सन २००१ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

भारत हा कृषिप्रधान देश असून, आजही देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला अन्न मिळते. शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी स्व. चौधरी चरणसिंग यांनी विशेष प्रयत्न केले. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना जवळून माहीत होत्या.

“आज आपण सुखाचे दोन घास खात आहोत, ते केवळ शेतकऱ्यांच्या घामामुळेच. त्यामुळे शेतकऱ्यांचा आदर करणे, त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे आणि शेतीबाबत जनजागृती निर्माण करणे, हाच राष्ट्रीय शेतकरी दिनाचा खरा उद्देश आहे,” असे प्रतिपादनही ढाकुलकर यांनी केले.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त वानाडोंगरी परिसरात झालेला हा सन्मान शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला बळ देणारा ठरला असून, समाजाने शेतकऱ्यांच्या योगदानाची जाणीव ठेवावी, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

गजानन ढाकुलकर साहसिक News -/24 वानाडोंगरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!