वर्धा -/धामणगाव हिंगणी येथील शिव टेकडीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल संयुक्त विद्यमाने आज १०० झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हिंगणी गावाचे सरपंच दामिनी डेकाटे, उपसरपंच स्वप्निल मुडे,पोलीस पाटील हिंगणी मारुती चचाने,पोलीस पाटील धामणगाव अमोल कांबळे हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजन करून झाली व नंतर प्रमुख उपस्थित गावाच्या सरपंच दामिनी यांनी वृक्ष रोपणाचे महत्त्व सांगितले त्यानी भाषणातून झाडांची लागवड व त्याचं संवर्धन कसे करता येईल व जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संदेश त्यांनी दिला दुसरे प्रमुख उपस्थिती मारुती चचाने यांनी यांनीही आपल्या भाषणादरम्यान वृक्ष संगोपनाची व वृक्ष लागवडीची महत्त्व सांगितली ते भाषण दरम्यान म्हणाले की आपण वृक्ष लावतो पण त्याचे संवर्धन व काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे.आजचे युवकांनी हप्त्यातून एकदा येऊन लागवड केलेल्या वृक्षांचे काळजी घेतली पाहिजे व उपसरपंच स्वप्निल मुडे यांनी वृक्ष रोपण व संवर्धन महत्व सांगितले.या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य शुभम सराफ,विश्व हिंदू परिषदेचे विनोद येवले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेलू तालुका संपर्कप्रमुख शशिकांत मांढरे,बजरंग दल सेलू तालुका संयोजक सनी राय,सुरज माहुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेलू तालुका बौद्धिक प्रमुख बौद्धिक प्रमुख माधव कुलासपूरकर,बजरंग दल धामणगाव संयोजक सुरज चारोडे,बजरंग दल धामणगाव चे शुभम कानोडे,आदित्य मुंजे,राजकुमार यादव,आदित्य धवड, पवन पारसे,नेहारे,पार्थ डेकाटे,आदी उपस्थित होते.