आ.कुणावार यांच्या प्रयत्नाने वनविभागाची तज्ञ चमू रिमडोह शिवारात दाखल,वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन केली होती विनंती.
हिंगणघाट -/ हिंगणघाट,समुद्रपूर तालुक्यातील गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार असून सदर वाघ हा समुद्रपुर तालुक्यातील खापरी,कोरा शिवारात अनेक शेतमजूरांना दिसला त्यानंतर हा वाघ पारडी शिवारामार्गे जाम तसेच हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट(राठी)परिसरात दिसला होता, सध्यास्थितीत हा वाघ शहरानजिकच्या रिमडोह शिवारातील कोचर यांच्या शेतात आढळून आल्याची माहिती आहे, सदर वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी आमदार कुणावार यांनी वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना विनंती केली होती आमदार कुणावार यांच्या मागणीची दखल घेत वनमंत्री यांनी संबंधित वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना तज्ञ चमू पाठविण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वनाधिकारी हेपट, पवार,खेडकर, गांवडे व खोब्रागडे तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तज्ञ चमू त्याठिकाणी पोहचली असून या वाघाला पकडण्यात यश येईल अशी अपेक्षा विधानसभा आ. समीर कुणावार यांनी व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे हिंगणघाट परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असेही आवाहनसुध्दा आ. समिर कुणावार यांनी केले आहे.