रेल्वे ट्रॅक सोडून परिसरात 500 कोटीचे अवैध गौण खनिज उत्खनन

0

🔥रेल्वे ट्रॅक सोडून परिसरात 500 कोटीचे अवैध गौण खनिज उत्खनन.🔥तक्रार खोटी निघाल्यास फौजदारी कारवाई करा – अमोल कोमावार यांचे सरकारला आवाहन.

यवतमाळ -/ वर्धा–यवतमाळ–नांदेड या बहुचर्चित रेल्वे प्रकल्पात अवैध गौण खनिज उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ईटीएस मोजणीमध्ये धक्कादायक बाबी समोर येत आहेत. कळंब तालुक्यात सुमारे 23 कोटी रुपये तर यवतमाळ तालुक्यात तब्बल 62 कोटी रुपयांचे अवैध उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणी अहवालात स्पष्ट झाले आहे. ही मोजणी केवळ रेल्वे ट्रॅकपुरती मर्यादित असून ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून गौण खनिज काढण्यात आले आहे. कळंब आणि यवतमाळ या दोनच तालुक्यात रेल्वे ट्रॅक परिसरातील उत्खननाची किंमत जवळपास 500 कोटी असल्याचा दावा करीत ईटीएस मोजणी करा, आणि यापेक्षा कमी गौण खनीज निघाल्यास माझ्यावर फौजदारी दाखल करा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी सरकारला केले आहे.

यवतमाळ तालुक्यातील मौजे कारली ते गोधनी या सुमारे 17 किलोमीटर पट्ट्यात 8 लाख 90 हजार 506 ब्रास गौण खनिज उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. शासनाच्या दरानुसार याची किंमत 62 कोटी 33 लाख रुपयांपेक्षा अधिक होते. अजुन 16 किलोमिटरची ईटीएस मोजणी बाकी आहे. दिलेला अहवाल सुध्दा अंदाजे असल्याने प्रत्यक्ष उत्खनन यापेक्षा अधिक असल्याचा आरोप अमोल कोमावार यांनी केला आहे. कळंब तालुक्यातील घोटी-चापर्डा भागात 23 कोटींचे उत्खनन समोर आले असून, उमरखेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रकल्पात अवैध गौण खनीज उत्खनन होत असल्याच्या तक्रारी 27 ऑगस्ट 2020 पासून सातत्याने तहसीलदार ते जिल्हाधिकारी स्तरापर्यंत करण्यात आल्या. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आता मात्र कोटयवधी रुपयांचे उत्खनन झाल्याचे समोर आल्याने या घोटाळ्याकडे दुलर्क्ष करणा-या तसेच शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडविण्यास सहकार्य करणा-या अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली आहे.

🔥रॉयल्टी बुडविण्यास अधिकारी जबाबदार.

या घोटाळ्याला तहसिलदार तसेच जिल्हा खनीकर्म अधिकारी हे सर्वाधिक जबाबदार आहे. सातत्याने तक्रारी केल्यानंतर सुध्दा तत्कालीन तसेच विद्यमान तहसिलदार, जिल्हा खनीकर्म अधिकारी यांनी तक्रारीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ईटीएस मोजणी करण्याची क्षमता असतांना खनीकर्म अधिका-यांनी साहित्य तसेच मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले नाही. शासनाच्या अहवालात उत्खननाच्या ठिकाणी मूळ जमीन पातळी (ओजीएल) उपलब्ध नसणे, तांत्रिक यंत्रणा अपुरी असणे यामुळे सरासरी मोजमापावर अहवाल तयार केल्याचे म्हटले आहे. वास्तविक हा ट्रॅक मधील घोटाळा सुध्दा मोठा असून सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करुन पुन्हा मोजावा तसेच ट्रॅक परिसरातील जवळपास पाचशे कोटीचे उत्खनन फक्त कळंब आणि यवतमाळ तालुक्यात झालेले असल्यामुळे ईटीएस मोजणी करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.(क्रमशः)

            ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!