🔥हाच तो फुटेज मध्ये दिसणारा लाचखोरीसाठी पटवारी हेमंत गुल्हाने समुद्रपूर तालुका सोडून चक्क हिंगणघाट मध्ये करतो वसुली.
समुद्रपूर -/आजकाल रेतीचे टिप्पर पकडणे हे पैसे कामावन्याच एकमेव काम काही पटवारी,तहसीलदार मिळून साठेगोट्याने ने करतात.असाच एक धूरंदर हेमंत गुल्हाने आपल्या कामाची समुद्रपूर तहसील ची हद्धा सोडून हिंगणघाट तहसीलच्या हद्दीमध्ये करतो पैसा ची वसुली.पैसे ना दिल्यास वर्धा कलेक्टर ऑफिसला रेती टिप्पर लावायची देतो धमकी.
हेमंत गुल्हाने हा यवतमाळ येथील रहिवासी आहे हा यवतमाळ वरून राळेगाव मार्गे समुद्रपूर येथे दररोज अपडाऊन करतो दिनांक 24 ताऱखीला सकाळी 10 वाजता कापसी इथे कात्री फाट्याजवळ एक रेती भरलेला टिप्पर पकडला व पाच मिनिटात 50 हजार रुपये दे अशी मागणी त्यानी केली, टिप्पर मालकाचे काही न ऐकता पाच मिनिटात पैसे नाही दिले तर वर्धा कलेक्टर ऑफिसला टिप्पर लावतो अशी धमकी दिली.धाकाने टिप्पर मालकांनी त्याला दहा ते पंधरा मिनिटात पन्नास हजार रुपये आणून दिले व त्याला विचारलं साहेब तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहे त्यांनी सांगितलं मी वर्धा कलेक्टर ऑफिसला आहे व तिथून तो हिंगणघाट मार्गाने निघुन गेला,त्याची माहिती काढली असता निदर्शनास आले कीं एम एच 29 बी वाय 9119 नंबरची रॉयल एनफिल्ड बुलेट गाडी घेऊन तो हिंगणघाट तहसील मध्ये टिप्पर पकडून वसुलीचे काम करतो.आहे आमच्या टीमने त्याला जाताना वडनेर रोडने एरंडगाव जवळ थांबविला व त्याला विचारणा केली असता त्यांनी हिंगणघाट तहसील ला आहे असे सांगितले.त्याची संपूर्ण माहिती घेतली असता समुद्रपूर तहसील हद्दीमध्ये पिंपळगाव येथे पटवारी असल्याची माहिती मिळाली तसेच हा वसुली करणारा लाचखोर पटवारी हेमंत गुल्हाने समुद्रपूर तहसीलदार कपिल हटकर साहेब कारवाई करणार का ..?? असा प्रश्न निर्माण होतो या लाचखोर पटवाऱ्याला समुद्रपूर तहसीलची हद्द सोडून हिंगणघाट तहसीलच्या हद्दीमध्ये वसुलीचे अधिकार दिले कोणी की हा भामटा कलेक्टर ऑफिस चा नाव सांगून असा वसुली करत राहणार का??या पटवाऱ्यावर वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वानमती मॅडम कारवाई करणार का??बघत राहा साहसिक news -24 काही वेळातच भाग दोन मध्ये सविस्तर व्हिडीओ सहित माहिती