आष्टी शहीद -/लहान आर्वी ग्रामपंचायत कक्षेतील गटग्राम लिंगापुर शेतशिवारातील शेतात असलेल्या बांधून असलेल्या बैलजोडीवर वाघाने हल्ला केला तर गोर्हाला ठार केलें. तर चार ते पाच दिवसांपुर्वी आष्टी-मोर्शी रोडवर तेलाई माता जवळ वाघाला अनेकांनी पाहिले.लिंगापुर आणि लहान आर्वी परीसरात वाघ आणि बिबट्या अनेक दिवसांपासून आहे. वाघ हा शेतशिवारात दिवस रात्रं शेतकऱ्यांना दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
लिंगापुर येथील येथील दिलीप विनायक निंभोरकर यांच्या शेतात बांधुन असलेल्या बैलजोडीवर हल्ला केला आणि गोर्हाला ठार केले.यात दिलीप निंभोरकर यांचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.वाघ आता गावात येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करतो आहे. वाघाच्या यां कृत्यांमुळे आता शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. वाघ हा शेतात दिसून येतो ही भिती आता कायम आहे. वनविभाग यांनी वाघचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.