लूटमार करणारा अट्टल फरार आरोपी पोलीसांच्या जाळ्यात….

0

हिंगणघाट -/  09 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी o7 वाजताच्या सुमारास फिर्यादी कलश दिपकराव लांबट वय 23 वर्ष सेन्ट्रल वार्ड,हिगणघाट हा आठवडी बाजार येथे जात असता काही ईसम यांनी अंधाराचा फायदा घेवुन फिर्यादी यास लाथाभूक्यानी मारहाण करून फिर्यादी जवळ असणारा ओपो कंपनीचा मोबाईल कि. 10 ,000 रू. चा बळजबरीने हिसकावून नेला त्यामुळे पो.स्टे हिगणघाट येथे कलम 394,506,34 भांदवी अन्वये चार आरोपी विरूध्द गुन्हा नोंद झाला होता पण त्यातील तीन आरोपी पो.स्टे येथे अटक करण्यात यश मिळाले पण यातील सराईत गुन्हे प्रवृतीचा अट्टल आरोपी भोजराज तुकाराम जंगले.वय 36 वर्ष, रा. खंडोबा वार्ड, हिगणघाट हा या गुन्हयात फरार होता त्यावेळी भोजराज जंगले याचा शोध घेत-घेत पाच महीन्याचा कालावधी लोटून गेला पण फरार आरोपीचा शोध काही लागत नव्हता म्हणुन फरार अट्टल आरोपींचा शोध घेवुन लवकरात लवकर गुन्हयात अटक करावी याकरीता पोलीस निरीक्षक मनोज गभणे,यांनी पो. उपनि. भारत वर्मा यांचे गुन्हे प्रगटीकरण पो.हवा यशवंत गोल्हर, ना.पो.कॉ विकास अवचट, राकेश आष्टणकर, पो.शि.नरेन्द्र आरेकर, दिपक हाके यांना प्राचारण केले व लूटमार करणारा अट्टल फरार आरोपी भोजराज जंगले यास लवकरात लवकर पकडडून स्वाधीन करावे असा तोंडी आदेश मिळाल्याने गुन्हें प्रगटीकरण पथकानी फरार आरोपी यास पकडण्यासाठी साफळा रचला त्यावेळेस गुन्हेगाराच्या हालचालीवर बारकाइनें लक्ष ठेवत असता फरार आरोपी यास नांदगाव रोडवर एक घातक हत्यारसह आम रस्त्यावर सार्वजनिक शांतता भंग करत असतांना गुन्हे प्रगटीकरण पथकाने मोठ्या सिताफतीने पकडुन ताब्यात घेतले व सदर फरार आरोपी हा घातक हत्यारानिशी मिळाल्याने भारतीय हत्यार कायदयान्वये कारवाई करून लुटमार करणा-या गुन्हयात अटक केली. सदर गुन्हेचा तपास पोलीस करीत आहे.पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ.सागर कवड़े,उपविभागीय पोलीस अधिकारी हिगणघाट रोशन पंडीत,हिंगणघाट पोलीस स्टेशन चे ठाणेदार मनोज गभणे यांचे मार्गदर्शनात पो.उपनि भारत वर्मा तसेच गुन्हे प्रगटीकरण पथकातील पो.हवा यशवंत गोल्हर, पो.ना. विकास अवचट,राकेश आष्टणकर ,नरेद्रआरेकर, पो.शि दिपक हाके यांनी केली.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!