🔥बरेच वर्षांपासून पूल दूरस्तीची गावकरी करित होते मागणी,सात गावाचा अवकाळी पावसानेच तोडला संपर्क,वाबगाव जवळील जिर्णो पूलाला पडले भगदाड
भिडी -/ वाबगाव गावालगत असलेल्या वाबगाव -अंदोरी मार्गावरिल जिर्णो अवस्थेत असलेल्या पूलाला पूलाच्या मंध्येभागीच मोठे भगदाड पडल्याने पूलाच्या पूर्ण भागाकडील सिमेंन्ट पाण्याने वाहून गेल्याने पूल पूर्णपणे पोखरला आहे यात पूढे येणा-या पावसात पूराचे पाणी पूलावरूण वाहल्यास यात मोठे भगदाड पडून येथे मोठा अपघात होण्याचे नाकारता येणार नाही यात गूरे, शालेय विद्यार्थी,ग्रामस्त ,व या मार्गाने ये जा करणा-या वाहण चालक ,पायदळी जाना-यांना अपघाताला मूकावे लागनार अपघात घडल्यावरच लोकप्रतिनीधी ,सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उघडेल का?असा प्रश्न गावकरी करित आहे
वर्धा – यवतमाळ राष्ट्रीय महामार्ग पासून हूसणापूर पासून वाबगाव ते अंदोरी मार्ग गेला आहे याच मार्गावर वाबगाव जवळच २०ते२५ कि.मी.अंतरावरील परिसराचे पूराचे पाणी येत असलेला एक मोठा नाला आहे याच नाल्यावरिल ब-याच वर्षांपासूनचा एक जिर्णोअवस्थेत असलेला पूल आहे पावसाळ्यात थोडा जरी पाउस झाला की या मार्गावरिल ७ गावाचा संपर्क तूटला जातो हे पावसाळ्यात नित्याचेच ठरत आहे
२२ मे च्या सायंकाळला अवकाळी पावसाने अक्षरस या परिसराला झोडपून काढले त्याच वेळेला या नाल्याला पूर आला व पूलावरून पाणी वाहू लागले पूराच्या पाण्याने पूलाचे बाजूने. खाचणे व पूलावरील निकृष्ट सिमेंट उखडून पूलाच्या मंध्येभागीच मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील हूसणापूर,सैदापूर,गणेश पूर,ममिणपूर ,अंदोरी ,बोपापूर,खर्डा या गावांचा संपर्क तूटला गेला
( ग्रामस्थांच्या सतर्कतेने अपघात टळला )
सांयकांळला आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरस झोडले नाल्याला पूर आला पाणी थांबला गावातील काही यूवक पूलावर गेले असता पूलावर मोठे भगदाड दिसून आल्याने यूवकांनी क्षणाचाही विचार न करता त्या खड्या भोवताल मोठं मोठे दगड ,लाकडे ठेवून ये जा करणा-या नागरीकांना सूचना दिल्या व मार्ग बंद केला हे सायकाळच्याच अगोदर केल्याने येथे जिवीत हाणी टळली हे ग्रामपंचायत माजी सदस्य मंगेश लाभे, रीतेश गंडे ,नरेश दरणे,विनायक गवारकर,पंपू वानखेडे ,अंबादास पडवे या यूवकांनी मोलाचे कार्य करून परिश्रम घेतले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
( सा.बा.विभाग,लोकप्रतिनीधी चे पूलासाठी झिजविले उंबरठे)
वाबगाव जवळील पूल हा निकृष्ट झाला असून या पूलाला २५ते३० कि.मी.अंतरावरिल परीसराचे पूराचे पाणी येत आहे हा पूल सिमेंट पायल्याचा असल्याने या पूलावरूण पूराचे पाणी वाहत जात नसून येथे पाणी कोबल्याने पूराचे पाणी थेट गावात शिरल्या जात आहे त्यामूळे अनेकांच्या घरांचे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे करीता या पूलाचे नविन बांधकाम करावे अशी मागणी गावक-यांनी अनेक वेळा सा.बा.विभाग ,खासदार ,आमदार या लोकप्रतिनिधीला करूण ग्रामस्थांनी उंबरठे झिजविले असल्याचे ग्रामस्त सांगतात
( आता पूलाचे काम केल्यास शेक-यांचे होणार हाल )
पूल पूर्णपणे पोखरला असून निकृष्ट झाला आहे त्याच मूळे पूलाला मोठे भगदाड पडल्याने हा मार्गच बंद झाला
पूढे शेतिचे कामे रोजमजूर गूरे कसे न्यावे असा प्रश्न?शेतक-यांना पडला आहे
तर याच नाल्याच्या पलिकडे विद्यालय आहे विद्यालयात येत्या जून २६ तारखेला विद्यार्थी शाळेत कसे जाणार हाही प्रश्न गंभिरच आहे. यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग हे किती सतर्क आहे हे यावरून सिद्ध होते.