बाळापुर -/ वंचित बहुजन महिला आघाडीची अकोला जिल्हा नवीन कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी गुरुवारी ५ सप्टेंबर जाहीर केली. त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे आणि जिल्हा महासचिवपदी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हा कार्यकारिणी महिनाभरापूर्वी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या ५ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. १९ सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हा महासचिवपदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी मीनाक्षी शेळके, सुरेखा सावदेकर, रूपाली गवई, दीपमाला कोहचाडे सिमाधांडे,संघटकपदी अनुराधा ठाकरे व निलोफर शाहीन झिया शाह, सचिवपदी मीना बावने, मीना इंगळे, सुधा दारोकार, उमा अंभोरे आणि सदस्य म्हणून दुर्गा अवचार, शिक्षण सभापती माया नाइक, विजया तायडे, शारदा क्षीरसागर, नीता गवड़ व चित्रा तेलगोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शहर,तालुका कार्यकारिणी लवकरच ! वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्ह्यातील शहर आणि तालुका कार्यकारिणीसह जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा कार्यकारिणीने कार्यकर्त्यांची नावे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचनाही वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीला पत्राद्वारे दिल्या आहेत.