अखेर वर्धा नदीच्या पात्रालगतच आढळला त्यांचा मृतदेहच..
आष्टी,तळेगाव शा.पंत)-/वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून धारदार शस्त्राने मारून खून केल्याची घटना सोमवारच्या रात्री उघडकीस आली आहे.वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजी पंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नमस्कारी येथील रहिवासी मृतक बाबाराव महादेव पारिसे वय अंदाजे 55 वर्ष हे यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.काल सोमवार असल्याने नमस्कारी या गावालगत असलेल्या भारसवाडा या गावाचा बाजार होता.नमस्कारी व भारसवाडा गावाला लागुनच वर्धा नदीचे पात्र आहे.व या गावाचा आठवडी बाजार असल्याने आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील नागरिक या बाजारामध्ये बाजार करण्यासाठी येत असतात तसेच मृतकाचे मुले देखील बाजार करण्याकरता बाजारात गेले होते.मृतकाचा मुलगा बाजारातून घरी गेल्यानंतर वडील घरी दिसले नाही म्हणून त्याने आईला वडील कुठे आहे असे विचारले असता त्यांनी मोबाईल रिचार्ज करायला गेले असे सांगितले. पुष्कळ वेळ झाला तरी वडील आले नसल्याने मृतकाच्या पत्नीने नदीच्या काठापर्यंत जाऊन बघितले पण मृतक हे दिसून आले नसल्याने मृताच्या पत्नीने आपल्या मुलाला वडिलांना पाहण्यासाठी जाण्यास सांगितले. मृतकाचा मुलगा व एक न नातेवाईक असे दोघेजण पायवाटेने जात असताना मुलाला आपले वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.यावेळी मृतकाच्या कपाळावर गालावर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने मारले असल्याचे आढळून आले.तात्काळ याची माहिती तळेगाव पोलिसांना देण्यात आली व तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप धोबे व पथकाने घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेत उत्तरिय तपासासाठी पाठवला असून पोलीस यंत्रणा आता आरोपीच्या शोधात कामाला लागली आहे या घटनेने परिसरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.