वणी मध्ये ट्रक अपघातात मारेगाव येथील युवक ठार…!

0

वणी-/ शहर हे यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्याला जोडणारे महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर कडे जाणाऱ्या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ही वणी शहरांच्या रिंग रोड वरूनच होत असते. त्यामुळे तीनही जिल्ह्यात जाणाऱ्या रोडवर असलेल्या संविधान चौकामध्ये दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी एका बारा चाकी ट्रक मुळे अपघात होऊन त्यात मारेगाव येथील 29 वर्षीय गणेश हरिचंद्र बदकी यांचा मृत्यू झाला. मृतक हा वरोरा येथील विवाहित बहिणीला झालेला नवजात बाळ बघण्यासाठी गेला होता. आज तो सकाळी पल्सर गाडी क्रमांक MH29AB 1563 ने वरोरा येथून मारेगाव करिता निघाला असता संविधान चौकामध्ये नागपूर वरून निलजईकडे जाणाऱ्या बारा चाकी ट्रकने गणेशच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला व मागच्या चाकामध्ये सापडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सदर ट्रक क्रमांक CG04 PH 0520 मध्ये डब्लू सी एल करिता विस्फोटक पदार्थ भरलेला असून निलजई खदान येथे जात होता. अपघातानंतर ड्रायव्हरने ट्रक ला घेऊन वणी पोलीस ठाण्यात दाखल झाला. ट्रक चालक विजय सवाई राठोड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281,106(1) अंतर्गत वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS-/24 वणी-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!