वर्धपूर गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने गावकऱ्यांमध्ये धास्ती….

0

🔥एम.पी.डब्लु जारोंडे यांच्याविरोधात डेंग्यू झालेल्या रूग्णाने केली तक्रार.

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील वर्धपूर या गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने गावकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे वर्धपूर हे एक छोटेसे गाव असून जवळच वडाळा हे गाव आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असुन त्या ठिकाणी वर्धपुर येथील नागरिक आपल्या आरोग्याची तपासणी करण्याकरिता जातात परंतु रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे डेंग्यू झालेल्या रूग्णाचे निदान मात्र वर्धपुर येथील उपकेंद्रात लागले नाही त्यामुळे रुग्णांची तब्येत अतिशय खालावली म्हणून त्यांना ताबडतोब अमरावती येथे हलविण्यात आले व तेथे डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचा
रिपोर्ट मिळाला व उपचार सुरू झाले तेथील रूग्णालयात का गेले असा वडाळा येथील मलेरियाच्या एम.पी.डब्लु जारोंडे या कर्मचाऱ्यांने फोन केला आणि उलट सुलट प्रश्न विचारले जसे वडाळा येथील उपकेंद्रात का आले ? साहुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात का नाही गेले ? अमरावतीला का गेले? असे अनेक प्रश्न जारोंगे यांनी केल्याने डेंग्यू झालेल्या रूग्णाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे डेंग्यू झालेल्या रूग्णाने वडाळा येथील मलेरियाचे कर्मचारी जारोंगे यांच्याविरोधात साहुर येथील मेडिकल ऑफिसर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे तसेच येथील नागरिकांनी सुध्दा तक्रार दाखल केली याची चौकशी करून वर्धपुर येथील नागरिकांनी योग्य न्याय देण्याची मागणी केली असुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच येथील मलेरियाचे कर्मचारी जारोंगे हे गावात नियमित भेटी देत नाही नाल्यांमध्ये टेमीफोस औषध टाकत नाही या सर्व बाबी तक्रारीत नमूद केलेल्या आहेत हे विशेष.

शरद वरकड साहसिक News-/24 साहूर,आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!