वर्धा जिल्हा करिता हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा….

0

भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्हा करिता दोन दिवसीय दिला ऑरेंज अलर्ट….

वर्धा -/ जिल्हातील सर्वत्र पावसाचे वातावरण पसरले अशातच भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्हा करिता १९ व २० जुलै ऑरेंज अलर्ट विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार विदर्भातील इतर जिल्हे रेड अलर्ट देण्यात आला असून सध्या मान्सून कालावधीत वर्धा जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस झालेला असून बहुतांश प्रकल्पामध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा आहे.मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील वर्धा,वना,बोर,पोथरा,यशोदा धाम, लालनाला इत्यादी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
या अनुषंगाने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे वीज गर्जना होत असल्याने शक्यतो घराच्या बाहेर पडू नये,घराबाहेर असल्यास झाडाखाली उभे राहू नये,एखाद्या सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये,नदी धरण काठी वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये,पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे,तसेच इशारा कालावधी साप्ताहिक सुट्टी असल्याने पर्यटन स्थळावर गर्दी करू नये,अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका,घडलेल्या घटनांची आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी, व सतर्क रहावे असे जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आव्हान केले आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!