वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्ष पदी नरेंद्र देशमुख..! महानगरासह तालुका अध्यक्षांचीही निवड..!!

0

वर्धा -/ व्हॉईस ऑफ मीडियाच्या वर्धा जिल्हा अध्यक्ष पदासाठी आज सोमवार ता.९ रोजी नरेंद्र देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी वर्धा आणि सिंदी रेल्वे महानगर कार्यकारिणीसह सेलू, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुकाध्यक्षांची सुद्धा लोकशाही पद्धतीने पार पडलेल्या मतदान प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली.सेवाग्राम आश्रम परिसरातील बापू कुटीत आज सोमवारी वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ चौधरी यांनी काम पाहिले तर विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा प्रवक्ता संजय धोंगडे यांनी यावेळी जिल्हा अध्यक्ष पदासाठी नरेंद्र देशमुख यांचं नाव सुचवले तर त्याला उपाध्यक्ष निलेश पिंजरकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सगळ्यांनी हात उंचावून सर्वानुमते नरेंद्र त्र्यंबकराव देशमुख यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली. सिंदी रेल्वे महानगर कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदासाठी आनंद पन्नालालजी छाजेड तर वर्धा महानगर कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदासाठी प्रा. खलील खतीब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यासोबतच सेलू तालुका अध्यक्ष पदासाठी सचिन तानबाजी धानकुटे, देवळी तालुका अध्यक्ष पदासाठी गणेश गोपाळराव शेंडे, आर्वी तालुका अध्यक्ष पदासाठी राजू श्रीहरी डोंगरे, आष्टी तालुका अध्यक्ष पदासाठी सुनिल महादेवराव साबळे, कारंजा तालुका अध्यक्ष पदासाठी संजय नागापूरे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष पदासाठी बादल तोतारामजी वानकर तर हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदासाठी विजयबाबू राठी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सर्वप्रथम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी सदर कार्यक्रमाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पिंजरकर यांनी सूत्रसंचालन तर जिल्हा प्रवक्ता संजय धोंगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नरेंद्र देशमुख, अनुपकुमार भार्गव, सचिन धानकुटे, आनंद छाजेड, प्रा. खलील खतीब, सुनिल साबळे, गणेश शेंडे, राजू डोंगरे, प्रशांत कलोडे, पंकज तडस, बबलू खान, प्रशांत बोरीकर, आशिष धापूडकर, मंगेश काळे, सतीश वांदिले, राजू कोहळे, यशवंत वांदिले, अजिज शेख, संजय टोणपे, सुधाकर बोबडे, प्रफुल्ल भटकर, धिरज कसारे, अनिल बगवे, पंढरी काकडे, गौरव देशमुख, राजू वाटाणे, भारत घवघवे, विनोद घोडे, प्रशांत आजनकर, संजय देसाई, विनय इंगळे, प्रमोद एडाखे, नितीन आष्टीकर, नजीर बिस्मिल्ला खाँ, स्वप्निल पोहकार, किरण राऊत, गजानन जिकार, रुपराव मोरे, सौ. रेणूका कोटंबकार, सचिन पोफळी, हर्षल काळे, चंद्रकांत पवार, आशिष इझनकर, रामटेके आदी जिल्ह्यांतील व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!